BJP dominates standing committee in Dharur | धारूरमध्ये स्थायी समितीवर भाजपाचे वर्चस्व

धारूरमध्ये स्थायी समितीवर भाजपाचे वर्चस्व

: येथील नगर परिषदेत विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध झाल्या. स्थायी समितीवर भाजपाचे वर्चस्व स्पष्ट झाले. सर्व सभापती पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने भाजपाचे वर्चस्व या समित्यांवर आले. यावेळी स्थायी समिती सभापती (पदसिद्ध) नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी, पाणी पुरवठा सभापती (पदसिद्ध) उपाध्यक्ष मीनाक्षी गायकवाड, बांधकाम व नियोजन सभापती ज्योती सिरसट, महिला बालकल्याण सभापती रंजना चव्हाण, सार्वजनिक आरोग्य, दिवाबत्ती शिक्षण सभापतीपदी दत्तात्रय सोनटक्के, स्थायी समिती सदस्य रोहीत हजारी यांची निवड झाली. सर्व समित्या भाजपाच्या ताब्यात आल्या आहेत. भूसंपादन अधिकारी भारती सागरे या पीठासन अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. त्यांना प्रभारी मुख्याधिकारी सुहास हजारे यांनी सहकार्य केले.

Web Title: BJP dominates standing committee in Dharur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.