आता सरकारी दवाखान्यातच मिळणार जन्माचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:29 IST2019-12-24T00:27:52+5:302019-12-24T00:29:32+5:30

जन्म प्रमाणपत्रासाठी ग्राम पंचायत, नगर पंचायत किंवा नगर पालिकेत आता खेटे मारण्याची गरज नाही. आरोग्य विभागाने ही सुविधा सरकारी दवाखान्यातच उपलब्ध करून दिली आहे.

Birth certificate will now be available at Government Hospital | आता सरकारी दवाखान्यातच मिळणार जन्माचे प्रमाणपत्र

आता सरकारी दवाखान्यातच मिळणार जन्माचे प्रमाणपत्र

ठळक मुद्देमोफत सुविधा : तीन दिवसांत प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशिक्षण

बीड : जन्म प्रमाणपत्रासाठी ग्राम पंचायत, नगर पंचायत किंवा नगर पालिकेत आता खेटे मारण्याची गरज नाही. आरोग्य विभागाने ही सुविधा सरकारी दवाखान्यातच उपलब्ध करून दिली आहे. प्रसुती झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या आत हे प्रमाणपत्र मातेच्या हाती टेकविले जाणार आहे. सोमवारी यासंदर्भात तालुका, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ही सुविधा मोफत असणार आहे.
आरोग्य विभाग नवीन वर्षांत नवनवीन उपक्रम हाती घेत आहे. नुकतीच जन्मल्यानंतर बाळांची आधार नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. १ जानेवारी २०२० पासून याची सुरूवात सर्वच आरोग्य संस्थात करण्याचा मानस आहेत. आता जन्मलेल्या बाळाला तात्काळ प्रमाणपत्र देण्याचा संकल्प केला आहे. सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात बाळ जन्मले तरी प्रमाणपत्रासाठी ग्रा.पं., नगर पंचायत किंवा नगर पालिकेत खेटे मारावे लागत होते. यात सामान्यांचा वेळ वाया जावून नाहक त्रास सहन करावा लागत होता. आता राज्य आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी केंद्राच्यावतीने हे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. खाजगी रुग्णालयात जन्मलेल्या बाळांसाठी ही सुविधा असणार नाही, असेही सांगण्यात आले.
दरम्यान, सोमवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात धन्वंतरी सभागृहात सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ही सुविधा मोफत असणार आहे. याची पुरेपुर अंमलबजावणी झाल्यास सामान्यांना मोठा फायदा होणार आहे.
जन्मल्यानंतर नाव नसते, म्हणून...
बाळ जन्मले की कोणीही नाव ठेवत नाही. मग प्रमाणपत्रावर नाव काय टाकायचे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यामुळे नावाची जागा रिक्त सोडून आई-वडिलांची सर्व माहिती घेतली जाणार आहे. वर्षापर्यंत आई-वडिलांनी आगोदर दिलेले प्रमाणपत्र घेऊन आल्यास त्यावर बाळाचे नाव वाढविले जाणार आहे.

Web Title: Birth certificate will now be available at Government Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.