शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'बीड जिल्ह्यात बिंदु नामावलीचं वाटोळं झालंय, १५ वर्षापासून एकच पोलीस अधिकारी'; सुरेश धसांनी सगळंच काढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:21 IST

पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मीक कराड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

Suresh Dhas ( Marathi News ) : पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मीक कराड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकील भाजपा आमदार सुरेश धस उपस्थित होते. बैठकीनंतर आमदार धस यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यात बिंदु नामावलीचं वाटोळं झाल्याची प्रतिक्रिया दिली. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, कोर्टाने पुढची तारीख दिली

मंत्रालयातील बैठकीनंतर भाजपा आमदार सुरेश धस यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी आमदार धस म्हणाले,बीड जिल्ह्यात बिंदु नामावलीची वाट लागली आहे. बीड जिल्ह्यात बिंदु नामावलीची वाट का लागली याचे शोध मोहिम केले पाहिजे. हे कोणामुळे झाले, का झाले? याची माहिती काढली पाहिजे. आज एसपींनी आडनावाने बोलावू नका म्हणून आदेश काढला. उद्या ही वेळ जिल्हाअधिकारी यांच्यावर येईल, असंही धस म्हणाले. 

"परळीमध्ये आजही राखेची वाहतूक होत आहे. फक्त ही वाहतूक रात्रीची सुरु आहे. अवैध राखेचे साठे जप्त करण्यात यावेत. गेल्या २० वर्षापासून परळीतील थर्मलमध्ये काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवर आहेत. बदली अधिनियम ३ वर्षाचा कार्यकाळ असतो. म्हणून मी परळी थर्मलमधील अधिकाऱ्यांना एवढ्या वर्षे एकाच ठिकाणी राहण्याची परवानगी कोणी दिली? यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे पत्र दिले आहे.  राखेचे अवैध साठे कोणाचे आहेत. याबाबत मी उद्या नावे जाहीर करणार आहे. अनेक धक्कादायक नावे आहेत, असा गौप्यस्फोटही सुरेश धस यांनी केला. 

"भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व्यापारी भगीरथ बियाणी यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. त्या आत्महत्येची चौकशी व्हावी अशी मागणी मी केली आहे,असंही आमदार सुरेश धस म्हणाले. परळी शहरातील रस्स्त्यांवर सुद्धा असेच पैसे उचलले आहेत. एकदा आपण परळीतील रस्ते दाखवले पाहिजेत. करुना शर्मा यांच्या गाडीमध्ये जी बंदुक ठेवली होती. ती बंदुक एका पोलीस अधिकाऱ्यानेच ठेवली होती. ते अधिकारी आजही बीड पोलिसमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. भास्कर केंद्रे नावाचे एक पोलीस आहेत, त्यांचे राखेचे टीप्पर आहेत, असा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. 

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवार निर्णय घेतील

धनंजय मुंडे यांच्या राजीनामा मागणीवर बोलताना धस म्हणाले, अजित पवार निर्णय घेतील. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही. त्यांच्या पक्षाचे काही आमदार राजीनामा घ्यायला पाहिजे असं सांगत आहेत. आम्ही भाजपामध्ये आहे, असंही धस म्हणाले.

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसDhananjay Mundeधनंजय मुंडेwalmik karadवाल्मीक कराडAjit Pawarअजित पवार