हेळंब घाटात बाईक-कारचा अपघात; लग्न समारंभासाठी निघालेल्या दोघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 14:39 IST2023-05-09T14:33:51+5:302023-05-09T14:39:04+5:30
मृत दोघेही परळी तालुक्यातील नंदनज येथील रहिवासी होते.

हेळंब घाटात बाईक-कारचा अपघात; लग्न समारंभासाठी निघालेल्या दोघांचा जागीच मृत्यू
परळी (बीड) : लग्नसमारंभासाठी हेळंबकडे निघालेले दोघांचा हेळंब घाटात बाईक-कारच्या अपघातात मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास झाला. दोघेही तालुक्यातील नंदनज येथील रहिवासी होते. ज्ञानोबा गुट्टे ( 45) आणि केशव गुट्टे ( 75 रा. नंदनज) अशी मृतांची नावे आहेत.
ज्ञानोबा गुट्टे, केशव गुट्टे हे दोघेजण बाईकवर एका लग्न समारंभासाठी आज सकाळी हेळंबकडे निघाले होते. दरम्यान, हेळंब घाटात बाईकला कारने जोरदार धडक दिली. त्यात बाईकवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह परळी उपजिल्हाधिरुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला आहेत. तेथे मृतांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला आहे.