शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

पंकजा मुंडेना होमग्राउंडमध्ये धक्का; सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचा एकहाती विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 19:49 IST

परली तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटी पांगरी-लिंबुटाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने सर्व जागावर विजय मिळवला आहे.

परळी: तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटी पांगरी-लिंबुटाच्या संचालक पदाच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे व व वाल्मीक कराड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व जागावर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीने  भाजप नेते फुलचंद कराड यांच्या मार्गदर्शनाखालील भाजप प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडाला आहे.

पांगरी लिंबुटा सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक पदाच्या 13 जागेसाठी एकूण 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. 13 जागेसाठी बुधवारी 2 नोव्हेंबर रोजी पांगरी येथे मतदान झाले. मतदानानंतर दोन तासाने सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलचे सर्व म्हणजे 13 उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.

माजी मंत्री धनंजय मुंडे व व वाल्मीक कराड यांच्या नेतृत्वाखालील  शेतकरी विकास पॅनलची  धुरा राष्ट्वादीचे युवक कार्यकर्ते ऍडव्होकेट श्रीनिवास मुंडे यांनी यशस्वीरित्या सांभाळली, त्यामुळे या पॅनलला सहज विजय प्राप्त करता आला. अशी प्रतिक्रिया  विजयी उमेदवार नंदकिशोर मुंडे यांनी दिली. या निवडणुकीत भाजपच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे शेतकरी परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे.

शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार:नंदकिशोर धोंडीराम मुंडे, व्यंकट दिंगाबर तिडके, मधुकर रामकृष्ण मुंडे, शांतीलाल गणपत मुंडे, महादेव नामदेव मुंडे, शिवाबाई संजीवन गित्ते, कुमार गुलाब काटूळे, राजेभाऊ बालासाहेब बनसोडे, मोहन लिंबाजी मुंडे, रमेश यडबाजी कराड,भागवत धोंडिबा मुंडे, कोंडीबा साहेबराव दिवटे, कुसुम दामोदर मुंडे.

 

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसDhananjay Mundeधनंजय मुंडेElectionनिवडणूक