मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By सोमनाथ खताळ | Updated: June 29, 2025 06:47 IST2025-06-29T06:45:40+5:302025-06-29T06:47:12+5:30

बीड शहरातील नामांकित उमाकरण शैक्षणिक संकुल येथे 17 वर्षाची मुलगी शिक्षण घेत होती. 30 जुलै 2024 ते २५ मे २०२५ यादरम्यान विजय पवार व प्रशांत खाटोकर यांनी विद्यार्थ्यीनीला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत तिचा लैंगिक छळ केला होता.

Big news: Beed police arrest Vijay Pawar, Prashant Khatokar for sexually harassing a student | मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बीड : अकरावीच्या वर्गातील विद्यार्थिनीचा केबिनमध्ये नेत लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन्ही शिक्षकांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी मध्यरात्री बारा वाजता ही कारवाई बीड तालुक्यातील मांजरसुभा परिसरात केली.

 बीड शहरातील नामांकित उमाकरण शैक्षणिक संकुल येथे 17 वर्षाची मुलगी शिक्षण घेत होटी. 30 जुलै 2024 ते २५ मे २०२५ यादरम्यान विजय पवार व प्रशांत खाटोकर यांनी विद्यार्थ्यीनीला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत तिचा लैंगिक छळ केला होता. तिला नग्न करत आपल्या मोबाईल मध्ये फोटोही काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी 26 जून रोजी रात्री शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला.

त्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह तीन पथक रवाना झाली होती. अखेर या दोन्ही शिक्षकांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बांटेवाड व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Big news: Beed police arrest Vijay Pawar, Prashant Khatokar for sexually harassing a student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.