मोठी नामुष्की! शेतकऱ्यांच्या मावेजा थकला, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी कोर्टाकडून जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 19:50 IST2025-02-17T19:29:25+5:302025-02-17T19:50:51+5:30

२०१५ रोजी शेतकऱ्यांना वाढीव मावेजा द्यावा असा निकाल कोर्टाने दिला होता. मात्र, शासनाकडून संपूर्ण रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली

Big embarrassment! Farmers' compensation blocked, Beed District Collector's car seized by court, what is the matter? | मोठी नामुष्की! शेतकऱ्यांच्या मावेजा थकला, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी कोर्टाकडून जप्त

मोठी नामुष्की! शेतकऱ्यांच्या मावेजा थकला, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी कोर्टाकडून जप्त

- पुरुषोत्तम करवा
माजलगाव (बीड) :
वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील शेतकऱ्यांच्या तलावात गेलेल्या जमिनीचा मावेजा न दिल्याने कोर्टाने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करून माजलगाव न्यायालयात जमा केली. गाडी जप्त केल्याने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठी नामुष्की ओढवली असून या निर्णयाने खळबळ उडाली आहे.

वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील शेतकरी शिवाजी टोगे, संतोष टोगे व बाबू मुंडे या शेतकऱ्यांची जमीन लघु सिंचन तलावासाठी शासनाने संपादित केली होती. या जमिनीचा अत्यंत तुटूपुंजा मावेजा त्यांना देण्यात आला होता. त्यामुळे या शेतकऱ्यांनी माजलगाव येथील सत्र न्यायालयात धाव घेत यासाठी दावा दाखल केला होता. या दाव्यावर कोर्टाने संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे अंशत: मान्य करून २९ ऑक्टोबर २०१५ रोजी या शेतकऱ्यांना वाढीव मावेजा द्यावा असा निकाल दिला होता. मात्र, शासनाने काही प्रमाणात रक्कम देऊन संपूर्ण रक्कम देण्यास चालढकल केली. त्यामुळे सह.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मा. बुधवंत साहेब यांनी व्याज लावून सदर रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दहा दिवसापूर्वी पारित केले होते. 

त्यानुसार कोर्टाने वादी यांचे वकील यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी यांना मावेजा बाबत सोमवारी जाऊन आपली बाजू मांडली व रक्कम अदा करण्यास सांगितले. मात्र, जिल्हाधिकारी यांनी पैशाची पूर्तता करू शकत नाही. तुम्ही गाडी घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतर कोर्टाच्या बेलीपने जिल्हाधिकारी यांची गाडी ( क्रमांक एम एच २३ बीसी २४०१ ) कायदेशीर बाबीची पूर्तता करून जप्त केली. जप्त करण्यात आलेली गाडी माजलगाव कोर्टात जमा करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ आली आहे. याप्रकरणी वादी शिवाजी टोगे, संतोष टोगे व बाबू मुंडे यांच्या वतीने अॅड. बाबुराव तिडके, एस.एस.मुंडे यांनी बाजू मांडली.

Web Title: Big embarrassment! Farmers' compensation blocked, Beed District Collector's car seized by court, what is the matter?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.