बीडकरांचा नादच खुळा; दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेड मॅरेथॉन’मध्ये धावले ९० किलोमीटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:28 IST2025-06-10T17:27:17+5:302025-06-10T17:28:19+5:30

जगभरातल्या सुमारे ७० देशांतील २३ हजार धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

Bidkar's voice is loud; He ran 90 kilometers in the 'Comrade Marathon' in South Africa | बीडकरांचा नादच खुळा; दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेड मॅरेथॉन’मध्ये धावले ९० किलोमीटर

बीडकरांचा नादच खुळा; दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेड मॅरेथॉन’मध्ये धावले ९० किलोमीटर

बीड : दक्षिण आफ्रिका येथे जगातील अवघड व प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ स्पर्धा ८ जून रोजी झाली. यात बीडमधील डॉ. संजय जानवळे, डॉ. विश्वास गवते आणि हरी ठाेंबरे यांनी ही मॅरेथॉन यशस्वी पूर्ण करत ९० किमीचे अंतर जवळपास ११ तासांत पूर्ण केले. त्यांनी जिल्ह्यामध्ये एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. बीडकरांनी दक्षिण आफ्रिकेतही नाद खुळा नेत्रदीपक कामगिरी केल्याने स्वागत होत आहे.

जगभरातल्या सुमारे ७० देशांतील २३ हजार धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. पीटरमारीत्जबर्ग ते डर्बन असा चढ-उताराचा हा मार्ग पार करताना धावपटूंचा कस लागतो. या स्पर्धेत भारतातून सुमारे ४१२, तर बीड जिल्ह्यातून बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय जानवळे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विश्वास गवते आणि हरी ठोंबरे हे तीन धावपटू सहभागी झाले होते. या तिघांनीही ही मॅराथॉन यशस्वी पार केली. ९० किलोमीटर अंतर पार करणारे या तिघांसह संतोष भोकरे एक आहेत. आगामी काळात धावपट्टूंची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, बीडमध्ये काही दिवस व सध्या पुण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले साईनाथ ठोंबरे यांनीही ९० किमीचे अंतर ११ तास २० मिनिटांत पार केले.

कोणाला किती वेळ लागला?
डॉ. विश्वास गवते - १० तास ४६ मिनिटे
हरी ठोंबरे - ११ तास १४ मिनिटे
डॉ. संजय जानवळे - ११ तास ३७ मिनिटे

५ महिने कसून सराव
पन्नाशी ओलांडल्यानंतर ९० किमी अंतर पार करणे, माझ्यासाठी आव्हान होते. गेली ५ महिने या स्पर्धेसाठी कसून सराव केला. दक्षिण आफ्रिकेत देशाचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटत होता. स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर खूप आनंद झाला. सर्व बीडकरांचे प्रोत्साहन मोलाचे ठरले. योगा प्रतिष्ठान व सर्वच धावपटूंनी मार्गदर्शन केले.
- डॉ. संजय जानवळे, धावपट्टू, बीड
---

Web Title: Bidkar's voice is loud; He ran 90 kilometers in the 'Comrade Marathon' in South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.