शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

१२५ शेतकऱ्यांना फुंडकर फळबाग योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा तालुक्यातील १२५ शेतक-यांना लाभ मिळाला आहे. ६३.३५ हेक्टरवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा तालुक्यातील १२५ शेतक-यांना लाभ मिळाला आहे. ६३.३५ हेक्टरवर फळबागाची लागवड करण्यात आली असून, याद्वारे शेतक-यांना २३ लाख एवढे अनुदान मिळाले आहे.ज्या शेतक-यांना फलबाग लागवड करायची होती.परंतू त्यांच्याकडे रोजगार हमीचे जॉब कार्ड नसल्याने त्यांना फलबाग योजनेचा लाभ मिळत नव्हता.परंतू भाऊसाहेब फुंडकर योजनेत या अटी शिथील केल्याने जॉब कार्ड नसलेल्या शेतक-यांना मोठा लाभ मिळत असून शेतक-यांना १०० टक्के अनुदान मिळणार आहे. माजलगाव कृषी कार्यालयाच्या अंतर्गत सर्वसाधारण शेतक-यांसाठी ३६ लाख रु पये, अनु.जातीतील शेतक-यांना २ लाख तर अनु.जमातीसाठी २८ हजार एवढा निधी उपलब्ध झाला होता. तालुक्यातील ९९७ शेतक-यांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते. अर्ज मोठ्या प्रमाणात आल्याने याची सोडत घेण्यात येवून ६६५ शेतक-यांना या योजनेसाठी पूर्वसंमती देण्यात आली.या शेतक-यांना ६४१ हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले त्यापैकी १२५ शेतक-यांच्या १०९ हेक्टरला तांत्रिक मान्यता देण्यात आली. त्यापैकी ६७ शेतक-यांनी ६३.३५ हेक्टरवर फलबाग लागवड केली.फळबाग लागवडीची मुदत नोव्हेंबरमध्ये संपली होती परंतू त्याला मुदत वाढवून ३१ मार्च करण्यात आली.फुंडकर फलबाग योजनेअंतर्गत फलबाग लागवड करणा-या शेतक-यांंना पहिल्या वर्षी ५० टक्के, दुस-या वर्षी २५ टक्के, तिस-या वर्षी २५ टक्के असा लाभ मिलणार आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी