शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

बीडच्या साहित्यिकाने दिली पुरस्काराची रक्कम ग्रंथालयांसाठी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 3:39 PM

डॉ. साळुंके यांच्या  ‘उदाहरणार्थ’ या बालनाट्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा एक लक्ष रु पयांचा वाङ्मय पुरस्कार मिळाला होता. त्यापैकी पन्नास हजार रुपये किंमतीची दर्जेदार पुस्तके बीड जिल्ह्यातील विविध शाळा आणि वाचनालयाला देण्याचा निर्णय त्यांनी  घेतला आहे.

ठळक मुद्देडॉ. साळुंके यांच्या  ‘उदाहरणार्थ’ या बालनाट्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा एक लक्ष रु पयांचा वाङ्मय पुरस्कार मिळाला होता. त्यापैकी पन्नास हजार रुपये किंमतीची दर्जेदार पुस्तके बीड जिल्ह्यातील विविध शाळा आणि वाचनालयाला देण्याचा निर्णय त्यांनी  घेतला

बीड : येथील लेखक आणि नाटककार डॉ. सतीश साळुंके यांनी संस्कार विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी दहा हजार रुपये किंंमतीची ग्रंथसंपदा भेट दिली. डॉ. साळुंके यांच्या  ‘उदाहरणार्थ’ या बालनाट्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा एक लक्ष रु पयांचा वाङ्मय पुरस्कार मिळाला होता. त्यापैकी पन्नास हजार रुपये किंमतीची दर्जेदार पुस्तके बीड जिल्ह्यातील विविध शाळा आणि वाचनालयाला देण्याचा निर्णय त्यांनी  घेतला आहे. साळुंके हे  संस्कार विद्यालयात शिक्षक असून त्यांना २००४ मध्ये आदर्श शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. 

 संस्कार विद्यालयात झालेल्या एका कार्यक्र मात डॉ. साळुंके यांनी ही पुस्तके विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सुभेदार यांना सुपूर्द केली. यावेळी सुभेदार म्हणाल्या, डॉ. साळुंके यांनी दिलेली पुस्तके दर्जेदार असून महाराष्ट्रातील नामवंत लेखक आणि कवींची असल्याने त्याचा उपयोग निश्चितच शाळेतील विद्यार्थ्यांना होईल. विद्यार्थ्याांनी  अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त अन्य पुस्तकांचे वाचन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ललित वाङमय वाचल्याने मुलांची विचार करण्याची क्षमता विकसित होते. तसेच त्यांच्या अभिव्यक्तीला नवीन धुमारे फुटतात. या प्रसंगी बोलताना डॉ.साळुंके म्हणाले की, संस्कार विद्यालयाचे व्यक्तिमत्त्व अन्य शाळांच्या तुलनेमध्ये निराळे आहे. शाळेचे कार्यवाह  कालिदासराव थिगळे यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यामुळे शाळेतील शिक्षकांना सातत्याने नवनवीन उपक्रमासाठी प्रेरणा मिळते. महाराष्ट्र शासनाचे आतापर्यंत आपल्याला वीस राज्य पुरस्कार मिळाले असून त्या यामागे संस्कार विद्यालयाच्या मोलाचा वाटा आहे असेही डॉ. साळुंके त्यांनी यावेळी नमूद केले. ग्रंथपाल महेश सर्वज्ञ यांनी आभार मानले.

बालसाहित्यिकांच्या बालवाङ्मयाचा समावेश

साळुंके यांनी दिलेल्या पुस्तकांमध्ये विविध कथासंग्रह, कवितासंग्रह, मराठी वाङमयाची समीक्षा ग्रंथ आणि विविध नाटकांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्रातील प्रसिद्ध बालसाहित्यिकांच्या बालवाङ्मयाचा समावेश आहे. 

 

टॅग्स :literatureसाहित्यBeedबीडStudentविद्यार्थीSchoolशाळा