बीडच्या 'खाकी'तील 'लाडकी बहीण' राज्यात अव्वल; पोलिसांची डागाळलेली प्रतिमा उंचावली

By सोमनाथ खताळ | Updated: April 1, 2025 15:59 IST2025-04-01T15:58:25+5:302025-04-01T15:59:59+5:30

बीडच्या पोलीस दलात कार्यरत असलेल्या विमल नंदकिशोर कोठुळे यांनी ९०० पैकी ७८८ गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक पटकावला.

Beed's 'Ladki Bhain' in 'Khaki' tops the state; who is vimal kothule | बीडच्या 'खाकी'तील 'लाडकी बहीण' राज्यात अव्वल; पोलिसांची डागाळलेली प्रतिमा उंचावली

बीडच्या 'खाकी'तील 'लाडकी बहीण' राज्यात अव्वल; पोलिसांची डागाळलेली प्रतिमा उंचावली

-सोमनाथ खताळ, बीड 
पुण्यातील शस्त्र निरीक्षण शाखा महाराष्ट्र राज्य यांनी घेतलेल्या परीक्षेत बीड जिल्हा पोलीस दलातील महिला कर्मचारी विमल कोठुळे यांनी राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. बीडच्या ‘खाकी’तील ‘लाडकी बहीण’ अव्वल आल्याने बीड पोलिसांची डागाळलेली प्रतिमा उंचावली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!  

विमल नंदकिशोर कोठुळे या सामान्य कुटुंबातील आहेत. भरती झाल्यापासून पोलिस दलासोबत त्या प्रामाणिक राहिल्या. त्यामुळेच त्यांना महत्त्वाच्या असणाऱ्या शस्त्र दुरुस्ती व देखभाल प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठवले. यात राज्यभरातील ७५ घटकांतील अधिकारी, कर्मचारी सहभागी होतात. 

हेही वाचा >>कळंबमधील 'त्या' महिलेच्या हत्येनंतर थरारक प्रसंग; संतोष देशमुख प्रकरणाशी काय कनेक्शन?

यात वार्षिक परीक्षा घेण्यात येते. यात ९०० पैकी ७८८ गुण मिळवून विमल यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. शस्त्र निरीक्षण शाखेच्या पाेलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी प्रमाणपत्र, चषक देऊन सन्मानित केले. 

यावेळी मुख्याध्यापक उपनिरीक्षक डॉ. प्रल्हाद शेळके, शिक्षक सफौ. संजय तावरे यांनी मार्गदर्शन केले. बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह जिल्हा पोलिस दलाने त्यांच्या यशाचे स्वागत केले आहे.

दोन वेळा तृतीय अन्...

१ जू २०२४ ते २८ मार्च २०२५ या कालावधीत प्रशिक्षण झाले. यात तीन, सहा महिने अशा दोन परीक्षांतही विमल यांनी तृतीय क्रमांक पटकावला होता. त्यानंतर १२ महिन्यांनी वार्षिक परीक्षा घेतली, त्यात अव्वल क्रमांक पटकावला. यामुळे बीड जिल्हा आणि पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

काय असते परीक्षा?

शस्त्र निरीक्षण शाखा ही एक स्वतंत्र शाखा असते. रायफल, बंदूकसह इतर सर्व शस्त्रांची देखभाल आणि दुरुस्ती या विभागातून केली जाते. अचानक काही बिघाड झाली, तर याच कर्मचाऱ्यांकडून दुरुस्ती केली जाते. अनेकदा थोडीही चूक जिवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे हे प्रशिक्षण अतिमहत्त्वाचे समजले जाते.

पहिल्यांदाच महिला अव्वल

१९६७ पासून हे प्रशिक्षण दिले जाते, परंतु आतापर्यंत पुरुषच राज्यात अव्वल येत होते. पहिल्यांदाच महिला कर्मचारी राज्यात अव्वल आल्या आहेत. त्यामुळे हा विक्रमही विमल कोठुळे यांच्या नावावर झाला आहे. या परीक्षेत धुळ्याचे अभिनय सावंत (७६४ गुण) द्वितीय, तर सोलापूर ग्रामीणच्या अनिता जामदार (७३९ गुण) या तृतीय आल्या आहेत.

'वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि माझी मेहनत, हेच यशाचे गणित आहे. हे यश माझे एकटीचे नसून, सर्व पोलिस दलाचे आहे. प्रामाणिक कर्तव्य केले आणि करत राहिल', अशा भावना विमल कोठुळे यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केल्या. 

Web Title: Beed's 'Ladki Bhain' in 'Khaki' tops the state; who is vimal kothule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.