Beed: मामा-भाच्याची भेट राहिली अधुरी; बस-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत तरूणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:32 IST2025-03-27T12:32:33+5:302025-03-27T12:32:58+5:30
आष्टी तालुक्यातील धानोरा गावाजवळ झाला अपघात

Beed: मामा-भाच्याची भेट राहिली अधुरी; बस-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत तरूणाचा मृत्यू
- नितीन कांबळे
कडा- भाच्याला भेटण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या मामाचा धानोरा गावाजवळ दुचाकी आणि बसचा समोरासमोर अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सव्वासातच्या दरम्यान घडली. अशोक मच्छिंद्र कदम ( ३५) असे जखमी तरूणाचे नाव आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील निंबळक येथील अशोक मच्छिंद्र कदम हा दुचाकीवरून ( क्रमांक एम.एच १६,एजी.८४४९) घेऊन कडा येथील भाच्याला भेटण्यासाठी बुधवारी निघाला. आष्टी तालुक्यातील धानोरा गावाजवळ बुधवारी सायंकाळी सव्वासातच्या दरम्यान तुळजापूरहून शिरूरच्या दिशेने निघालेली बस ( क्रमांक एम.एच १४,बीटी ४११६) आणि दुचाकीची समोरासमोर धडक दिली. यात अशोक कदम हा तरूण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारार्थ अहिल्यानगर येथे पाठविण्यात आले होते. मात्र, उपचारदरम्यान पहाटे त्याचा मृत्यू झाला.
१०८ रूग्णवाहिका वेळेवर येईल का?
गरजूंना तात्काळ मदत मिळावी म्हणून १०८ रूग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. मात्र, धानोरा गावाजवळ झालेल्या अपघातानंतर संपर्क करूनही रूग्णवाहिका वेळेवर आली नाही. रूग्णवाहिका वेळेवर येणार नसेल तर त्याचा फायदा काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.