शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Beed: बीडजवळ दोन बस जाळल्या, महामार्गावर टायर जाळले, महामार्गावर वाहतूक विस्कळीत

By अनिल भंडारी | Updated: October 28, 2023 23:15 IST

Beed News: बीडहून कोल्हापूरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस थांबवून प्रवाशांना उतरण्यास भाग पाडून अज्ञात जमावाने पेटवून दिली तर याच मार्गावर मांजरसुंबा घाटात अन्य एक बस पेटवून दिल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

बीडबीडहून कोल्हापूरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस थांबवून प्रवाशांना उतरण्यास भाग पाडून अज्ञात जमावाने पेटवून दिली तर याच मार्गावर मांजरसुंबा घाटात अन्य एक बस पेटवून दिल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. दरम्यान सुरक्षेच्या कारणावरून बीड येथून जाणाऱ्या आणि येणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार बीड येथील बसस्थानकातून ८ वाजता नेहमीप्रमाणे कोल्हापूर बस (क्र. एमएच ०९ एफएल ००७५) मार्गस्थ झाली होती. दरम्यान आहेर वडगाव फाटा परिसरात जमावाने ही बस अडवून प्रवाशांना खाली उतरवून ती पेटवून देण्यात आली. ही बसचे संपूर्ण नुकसान झाले. याच दरम्यान मांजरसुंबा घाटात दुसऱ्या जमावाने अहमदपूर- छत्रपती संभाजी नगर बस थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतू बस न थांबल्याने ज्वलनशील पदार्थ फेकला. त्यामुळे बसच्या इंजिनने पेट घेतल्याचे समजते. या बसमधील प्रवासी तातडीने सुखरूपपणे बाहेर पडले. दोन्ही बसमधील प्रवाशांनी मिळेल त्या वाहनातून बीड गाठले. माहिती मिळताच बीड ग्रामीण व नेकनूर ठाण्याचे पोलिस अधिकारी, एसटीचे अधिकारी तसेच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. दरम्यान पीड येथू जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या असून आरक्षण केलेल्या प्रवाशांना रिफंड मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

जालना रोडवर टायर जाळलेरात्री साडेआठ- नऊ वाजेच्या दरम्यान बीड बायपास महालक्ष्मी चौक तसेच धुळे- सोलपूर महामार्गावर अज्ञात व्यक्तींनी टायर जाळले. त्यामुळे दोन्ही बाजुने एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. वाहतूक पोलिस तसेच पोलिस या ठिकाणी पोहचल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

टॅग्स :Beedबीड