बीडमध्ये राजीनाम्यासाठी महिला उपसरपंचाची छेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:37 IST2018-05-21T00:37:15+5:302018-05-21T00:37:15+5:30

बीडमध्ये राजीनाम्यासाठी महिला उपसरपंचाची छेड
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राजीनामा देण्यासाठी दबाव टाकत महिला उपसरपंचाची छेड काढल्याप्रकरणी धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती महादेव बबन बडे याच्यासह चौघांविरुद्ध दिंद्रूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंद्रूड पोलीस ठाण्यांतर्गत एका गावातील महिला उपसरपंचावर राजीनामा द्यावा, म्हणून मागील दीड वर्षांपासून दबाव आणला जात आहे. राजीनामा देण्यासंदर्भात वारंवार सांगूनही कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने चौघांनी मोबाईल व्हॉट्सअॅपद्वारे अश्लील शब्दात बदनामी केली. तसेच पाठलाग करुन अश्लील भाषा वापरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी महिला उपसरपंचाने दिलेल्या फिर्यादीवरुन धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती महादेव बबन बडे, विष्णू भगवान बडे, भगवान वैजीनाथ बडे, बालासाहेब बळीराम बडे यांच्याविरुद्ध कलम ३५४ ड, ३५४ अ (४) ५०४, ३४ भादंविप्रमाणे दिंद्रूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि टाकसाळ हे करीत आहेत.