Beed postponed water supply for two days | बीड शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस पुढे ढकलला

बीड शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस पुढे ढकलला

बीड : बिंदुसरा धरणातून येणारी जलवाहिनी बीड बायपासवर लिकेज झाली. त्यामुळे पेठ बीड, सुभाष रोड, मोंढा रोड भागातील पाणीपुरवठा दोन दिवस पुढे ढकलला आहे. दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
बीड शहराला माजलगाव व पाली येथील बिंदुसरा धरणातून पाणी पुरवठा होतो. बिंदुसरा धरणातून येणारी जलवाहिनीचा बीड बायपासवर जोड आहे. हाच जोड लिकेज झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. त्यामुळे पालिकेने या धरणावर अवंलबून असलेला सुभाष रोड, पेठ बीड, विप्र नगर, सारडा नगरी, जिजामाता चौक, सावतामाळी चौक इ. भागांत दोन दिवस उशिराने पाणी येणार आहे. पालिकेच्या वतीने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन दिवसानंतर सुरळीत पाणी येईल, असे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

बीड बायपासवर जलवाहिनी लिकेज झाली आहे. दुरूस्तीचे काम गतीने केले जात आहे. दोन दिवस पाणी पुरवठा पुढे ढकलला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.
- राहुल टाळके
अभियंता, पाणी पुरवठा विभाग न.प.बीड

Web Title: Beed postponed water supply for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.