बीड: बीड येथील वस्तू व सेवा कर (GST) कार्यालयातील अधिकारी सचिन नारायण जाधवर यांच्या मृत्यू प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. "माझे पती कधीच आत्महत्या करू शकत नाहीत, त्यांना गेल्या महिनाभरापासून प्रचंड मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले गेले," असा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी केला आहे. शुक्रवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांनी या प्रकरणातील धक्कादायक खुलासे केले आहेत.
षडयंत्राचा संशय आणि टोकाचा छळ सचिन जाधवर यांनी १७ जानेवारी रोजी कपिलधारवाडी परिसरात टोकाचे पाऊल उचलले होते. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये सहाय्यक आयुक्त दिलीप फाटे यांच्या नावाचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. मयुरी जाधवर यांनी आरोप केला की, "केवळ ऑफिसमध्येच नाही, तर वैयक्तिक आयुष्यातही त्यांना छळले जात होते. शाळेत गेलेल्या आमच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. इतकेच नाही तर, कार्यालयाबाहेर त्यांच्या वाहनाला धडक देऊन त्यांना शिवीगाळ करण्यात आली होती. हे सर्व त्यांना मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठीच केले गेले."
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न घटनेला आठवडा उलटूनही गुन्हा दाखल होत नसल्याने जाधवर कुटुंबियांच्या संयमाचा बांध सुटला. "आम्हाला मूळ सुसाईड नोट का दाखवली जात नाही? पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव आहे?" असा रोखठोक सवाल मयुरी जाधवर यांनी उपस्थित केला. सचिन यांच्या भावानेही आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पोलीस ठाण्यात ठिय्यापोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर जाधवर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दारातच ठिय्या मांडला. 'जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत उठणार नाही' असा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाला नमते घ्यावे लागले. अखेर गुन्हा दाखल करून घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हा ठिय्या मागे घेण्यात आला. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या मृत्यूमागील हे गूढ आता पोलीस तपासात कधी उलगडणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Web Summary : The wife of deceased GST officer Sachin Jadhav alleges severe harassment drove him to suicide. She claims her son was nearly abducted, and her husband's car was attacked. The family protested police inaction, demanding justice and a thorough investigation.
Web Summary : मृत जीएसटी अधिकारी सचिन जाधव की पत्नी ने आरोप लगाया कि उत्पीड़न ने उन्हें आत्महत्या के लिए मजबूर किया। उसने दावा किया कि उसके बेटे का अपहरण करने की कोशिश की गई, और उसके पति की कार पर हमला किया गया। परिवार ने पुलिस की निष्क्रियता का विरोध किया, न्याय और गहन जांच की मांग की।