Beed: शेतातच सुरू केला जुगार अड्डा; १२ जुगारी अटकेत, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 18:49 IST2025-08-26T18:49:26+5:302025-08-26T18:49:57+5:30

अंभोरा पोलीसांची जुगार अड्ड्यावर धाड

Beed: Gambling den opened in a field; 12 gamblers arrested, property worth Rs 9 lakh seized | Beed: शेतातच सुरू केला जुगार अड्डा; १२ जुगारी अटकेत, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Beed: शेतातच सुरू केला जुगार अड्डा; १२ जुगारी अटकेत, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

- नितीन कांबळे
कडा (बीड) :
धामणगाव येथील एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सोमवारी सायंकाळच्या दरम्यान पोलिसांनी धाड टाकली. यावेळी १२ जुगारी पोलिसांनी ताब्यात घेतले. तर ८ लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील धामणगाव येथील एका शेतात जुगारीचा अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी सोमवारी सायंकाळच्या दरम्यान जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी पोलिसांनी १२ जणांना ताब्यात घेतळे. तर रोख रक्कम, दुचाकी,मोबाईल व जुगारीचे साहित्य असा एकूण ८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे, यांच्या मार्गदर्शनाखाली अंभोरा पोलिसांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार सोपान येवले करीत आहे.

Web Title: Beed: Gambling den opened in a field; 12 gamblers arrested, property worth Rs 9 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.