Beed: माजलगाव तालुक्यात अनेक गावे पाण्याखाली, एनडीआरएफने केली गर्भवतीची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:30 IST2025-09-23T13:29:19+5:302025-09-23T13:30:43+5:30
माजलगाव तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढले; एनडीआरएफचे जवान मदतीसाठी धावले

Beed: माजलगाव तालुक्यात अनेक गावे पाण्याखाली, एनडीआरएफने केली गर्भवतीची सुटका
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव ( बीड) : पैठण येथील नाथसागर व माजलगाव येथील माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू असल्याने माजलगाव तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या
पाण्याने वेढले आहे.सांडस चिंचोली व डेपेगाव या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांना तैनात करण्यात आली आहे. यात बरोबर तालुक्यातील अनेक गावांना पाण्याचा वेडा असल्याने त्या गावचा अनेक गावांची संपर्क तुटला आहे.
माजलगाव धरणातून सोमवारी वरपासून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू होता परंतु धरणाच्या वरील भागात झालेल्या मोठ्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक येऊ लागल्याने सोमवारी रात्री 1 लाख 15 हजार क्युसेक्स एवढे पाणी सोडण्यात आलेले असल्याने सिंदफणा नदीवरील जुन्या पुलावरून पाणी गेले. त्याचबरोबर गोदावरी नदी पात्राला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने व मंजरथ या ठिकाणी गोदावरी व सिंदफनाचा त्रिवेणी संगम असल्याने गोदावरी नदीतील पाणी सिंदफनाच्या पाण्याला आत मध्ये लवकर येऊन देत नसल्यामुळे सिंदफनाचे पाणी मोठ्या प्रमाणात दुर दुर पसरले आहे यामुळे अनेकांच्या शेतात पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील सांडस चिंचोली, डेपेगाव या गावात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी घुसल्याने एनडीआरएफच्या जवानांना पाचरण करण्यात आले. मंगळवारी सकाळपासून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम जवान करत आहेत. चिंचोली येथील एका महिलेला प्रस्तुतीसाठी माजलगावकडे आणण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांची मदत घेण्यात आली. त्या महिलेस रुग्णालयात सुरक्षितपणे पाठवण्यात आले. त्याचबरोबर मोगरा येथील पुलावरून पाणी गेल्याने अनेक गावचा संपर्क तुटला आहे तसेच सरस्वती नदीला पूर आल्याने डाकेप्रिप्री ,मोगरा ,पोहनेर , साळेगाव , कोथाळा , खतगव्हाण , डिग्रस आदि गावांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे.
माजलगाव ते परतुर रस्त्यावर असलेल्या सावंगी येथील पुलावरून गोदावरीचे पाणी वाहत आहे. यामुळे कालपासून हा रस्ता बंद आहे. त्यामुळे अनेकांचा संपर्क तुटला आहे. त्याचबरोबर गोदावरी नदीकाठच्या अनेक गावात पाणी घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.