शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

टाकरवणच्या ZP शाळेत संगणक लॅबसह प्रयोगशाळा; २२ लाखांच्या लोकवर्गणीने 'हायटेक' लुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:50 IST

बीडच्या 'टाकरवण'चा डंका! लोकवर्गणीतून २२ लाखांचा निधी उभारून जिल्हा परिषद शाळेचा कायापालट; खासगी शाळांनाही पडेल भुरळ

टाकरवण ( बीड) :बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी घेतलेल्या पुढाकारातून शिक्षक आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे या शाळेचा कायापालट केला आहे. लोकवर्गणीतून तब्बल २२ लाख रुपयांचा निधी उभारून या सर्वांनी शाळेत आवश्यक शैक्षणिक सुविधांसह इतर उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागांतील अशा शाळांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. 

चर्चा, नियोजन आणि अंमलबजावणी...अपुऱ्या सोयीसुविधा आणि देखभालीअभावी खरे तर ही शाळाच बंद पडण्याच्या मार्गावर होती. पंरतु, मुख्याध्यापक म्हणून रुजू झालेले रत्नाकर वाघमारे यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेत विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली. मुख्याध्यापक, शिक्षक, गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती असे सारेच एकत्र आले. चर्चेतून नियोजन ठरले आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. 

पाहता पाहता जमले २२ लाखमुख्याध्यापक वाघमारे यांनी गावकऱ्यांना सातत्याने शाळेच्या अवस्थेबाबत जाणीव करून देत सुधारणांसाठी प्रेरणा दिली. मग, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ लव्हाळे यांनी पुढाकार घेतला आणि गावकरीही सरसावले. कुणी शंभर, कुणी हजार, कुणी महिन्याची बचत शाळेसाठी दिली आणि पाहता पाहता लोकवर्गणीतून तब्बल २२ लाख रुपयांचा निधी जमा झाला. 

संगणक कक्षासह प्रयोगशाळाही सज्जलोकवर्गणीतून जमलेला निधी अगदी नियोजनपूर्वक वापरून या शाळेचा चेहरामोहराच बदलला आहे. केवळ रंगरंगोटीपुरते मर्यादित न राहता शाळेत आता संगणक कक्ष, विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा सज्ज झाली आहे. परिसरात वृक्षारोपणासोबत नटलेली सेंद्रीय परसबाग आता सर्वांनाच आकर्षित करीत आहे. शिवाय वर्गखोल्यांना कल्पकतेने दिलेली नावे, विद्यार्थ्यांच्या चप्पल-बूटांसाठी स्वतंत्र स्टँड, शिक्षकांसाठी ठरवून दिलेला गणवेष अशा उपक्रमांतून एक शिस्त लागली आहे.

आता अभ्यासाकडे लक्षआवश्यक सुविधांसाठी राबवलेल्या उपक्रमानंतर मुख्याध्यापक-शिक्षकांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. अभ्यासपद्धतीत कृतिशील अभ्यासक्रमावर भर दिला. शाळा हे ओझे नाही, तर आनंद लुटण्याची जागा असल्याची भावना मुलांमध्ये निर्माण झाली. पालक-ग्रामस्थांसाठीही ही शाळा आता गावाच्या आत्मसन्मानाचे प्रतीक ठरली आहे. 

आशेचा नवा किरणनवे अभ्यासक्रम, नव्या धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये जिल्हा परिषद शाळांबद्दल असलेली अनास्था, शैक्षणिक निधीत वारंवार होणारी कपात, शिक्षक भरतीवरील मर्यादा, शाळेसाठी दिला जाणारा अपुरा निधी यातून निर्माण होणाऱ्या दुरवस्थेत टाकरवणची ही शाळा मात्र आदर्श ठरली आहे. आधुनिक काळात खासगी तसेच इंग्रजी शाळांचे आकर्षण, भरमसाठ शुल्क भरण्यासाठी पालकांची होणारी ससेहोलपट आणि ओस पडत चाललेल्या जि. प. शाळा पाहता टाकरवणची ही शाळा शिक्षक, विद्यार्थी, गावकरी आणि प्रशासनासाठीही आशेचा किरण ठरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Takrwanch ZP School transforms with community funds: A rural success.

Web Summary : Takrwanch ZP School revamped through community effort. ₹22 lakh raised. Computer lab, science lab, garden established, setting rural school benchmark. Focus now on academics.
टॅग्स :BeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्रzp schoolजिल्हा परिषद शाळा