प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्हा देशात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:43 IST2018-04-21T00:43:32+5:302018-04-21T00:43:32+5:30
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्हा संपूर्ण देशात अव्वल ठरला आहे. जिल्हयाला प्रधानमंत्री उत्कृष्ट लोकप्रशासन पुरस्कार जाहीर झाला असून नागरी सेवा दिनानिमित्त दिल्ली येथे शनिवारी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एम. डी. सिंह आणि जिल्हा कृषी अधीक्षक एम. एल. चपळे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्हा देशात अव्वल
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्हा संपूर्ण देशात अव्वल ठरला आहे. जिल्हयाला प्रधानमंत्री उत्कृष्ट लोकप्रशासन पुरस्कार जाहीर झाला असून नागरी सेवा दिनानिमित्त दिल्ली येथे शनिवारी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एम. डी. सिंह आणि जिल्हा कृषी अधीक्षक एम. एल. चपळे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा पाठपुरावा, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केलेले प्रशासनाचे नेतृत्व, महसूल, कृषी विभाग, सर्व बॅँका आणि कॉमन सर्व्हिस सेंटर चालकांनी प्रयत्न केल्यामुळे बीडचा शनिवारी दिल्लीत सन्मान होत आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये केलेल्या उत्कृष्ट अंमलबजावणीबद्दल प्रधानमंत्री उत्कृष्ट लोक प्रशासन पुरस्कार जिल्हयाला जाहीर झाला आहे. जिल्ह्यात २०१६ च्या खरीप हंगामात १३ लाख ५४ हजार ४९६ शेतकरी विमा योजनेत सहभागी होते. ६ लाख ३३ हजार २८६ हेक्टर विमा संरक्षण क्षेत्र संरक्षित केले होते. यासाठी ५५ कोटी ४६ लक्ष रुपये विमा हप्ता भरण्यात आला होता.
६ लाख २४९ लाभार्थ्यांना २३२ कोटी ८४ लाख रुपयांचा विमा मंजूर झाला. तसेच रब्बी हंगामात १ लाख ६१ हजार ७४ शेतकरी सहभागी झाले होते. ९९ हजार ४१ हेक्टर विमा संरक्षित क्षेत्रासाठी २६२.५७ लाख रुपये हप्ता भरण्यात आला. ७ हजार १२९ लाभार्थ्यांना ४०५.०४ लाख रुपये विमा मंजूर झाला. अशा प्रकारे एकूण १५ लाख १५ हजार ५७० सहभागी शेतकऱ्यांनी ७ लाख ३२ हजार ३२७ हेक्टर विमा संरक्षित क्षेत्र करण्यासाठी ५८०८.५९ लक्ष रुपये विमा हप्ता भरला होता. ६ लाख ७ हजार ३७८ लाभार्थी शेतकºयांना २३६कोटी ८९ लाख एवढा विमा मंजूर झाला.
शेतकरी आणि यंत्रणांचा प्रतिसाद
गेल्या दोन वर्षांत बीड जिल्हयातील शेतकºयांचा विमा भरण्याकडे सकारात्मक कल दिसला शिवाय शेतकºयांनी या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्यामुळे जिल्ह्याला हा पुरस्कार मिळाला. शेतकºयांना पीक विमा भरण्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात मी वेळोवेळी घेतलेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचे पालन संबंधित यंत्रणांनी केल्यामुळे हा पुरस्कार जिल्ह्याला मिळाला आहे. - पंकजा मुंडे, पालकमंत्री