शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

बीड जिल्ह्यात अवैध वाळू उपस्यावरील १४७ कारवायांमधून दीड कोटीचा  दंड वसूल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 19:17 IST

जिल्ह्यातील ५ उपविभागीय मंडळात अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाºयांकडून मार्च महिन्यापासून १ कोटी ५७ लाख ६७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

बीड : जिल्ह्यातील ५ उपविभागीय मंडळात अवैध वाळू उपसा व वाहतूक करणा-यांकडून मार्च महिन्यापासून १ कोटी ५७ लाख ६७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तरी देखील जिल्ह्यातील बंद असलेल्या वाळू घाटांवरुन अवैध वाळू उपसा होत असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात २०१८-१९ वर्षासाठी ५ वाळू घाटांचे लिलाव करण्यात आले होते. त्यामधून शासनाला १ कोटी ८० लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. ज्यांना हे लिलाव दिलेले आहेत त्यांना वाळू उपसा करण्यासंदर्भांत काही नियम व अटी ठरवून दिलेल्या आहेत. मात्र, हे सर्व नियम पायदळी तुडवत जिल्ह्यात अवैध वाळू उपसा सुरू आहे.

आतापर्यंत १४७ अवैध वाळू वाहतूक करणाºयांवर कारवाई केली आहे. यामध्ये ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून, दंड वसुली करण्यात आलेली आहे. माजलगाव तालुक्यात ३, बीडमध्ये २ व अंबाजोगाईत १ असे ५ वाळू घाट अधिकृतरित्या वाळू उपसा करण्याची परवानगी आहे. मात्र, या ठिकाणाहून देखील रोज करण्यात येणाºया उपसा क्षमतेपेक्षा अधिक वाळू साठा काढला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. या वाढत्या उत्खननामुळे नद्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच ज्या गावांमधून वाळूचे वाहने जातात त्या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या विषयी अनेक वेळा प्रशासनाक डे तक्रार करुन देखील कुठलीही कारवाई केली जात नाही.  

वाळूची किंमत ठरवावी उपसा केलेली वाळू अव्वाच्या सव्वा किंमतीने विक्री केली जाते. ग्राहकांना प्रत्येक ब्रासला किती भाव आहे, याविषयी शासनाने धोरण ठरवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

या वाळू घाटांवरून होतो अवैध वाळू उपसा जिल्ह्यातील रंजेगाव, खुंडरस, हिवरा, नाथापूर, गोदावरी काठावरील गावांमधून वाळू उपसा होत असल्याची माहिती आहे. बीड तालुक्यातील रंजेगाव याठिकाणी कलम १४४ लागू असताना देखील येथून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा केला जातो. तसेच याठिकाणी वाळू उपसा करणाºयांकडे पोलीस प्रशासन व महसूल यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. गाडी चालकांकडून २० ते ३०  हजार रुपये हप्ता पोलिसांकडून घेतला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी ११ पथके जिल्ह्यात कार्यरत आहेत. यामध्ये महसूल, पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत. मंडळनिहाय कारवाई करण्यासाठी कर्मचारी नेमलेले आहेत. यामुळे मोठ्या प्रमात अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर प्रतिबंध आले आहेत, असे गौण खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले

कारवायांची आकडेवारी(मार्च ते जुलै २०१८)तालुका    कारवाया    दंड (लाखात)बीड                ३    ६.२१गेवराई          १९    २९.७५शिरुर            १७    १४.७५आष्टी            ५    २.८०पाटोदा           २    ०.८१माजलगाव    ८८    ८५.३४धारुर              १    २.८५वडवणी          २    ०.८१अंबाजोगाई    ३    १.३०केज               २    ०.३९परळी             ६    १२.६६एकूण        १४७    १५७.६७

टॅग्स :sandवाळूTahasildarतहसीलदारTaxकर