केज (जि. बीड): येथील दोन वेगवेगळ्या महाविद्यालयांतून दोन विद्यार्थिनी अचानक बेपत्ता झाल्याने केज तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या तीन दिवसांत या दोन घटना घडल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
वडिलांची नजर चुकवून मुलगी बेपत्तापहिली घटना बुधवारी (४ मार्च) घडली. नामेवाडी येथील जयश्री मधुकर केदार (२२) ही 'जीवन शिक्षण महाविद्यालया'त बी.एस्सी. द्वितीय वर्षात शिकत आहे. ती वडिलांसोबत परीक्षा फी भरण्यासाठी महाविद्यालयात आली होती. फी भरल्यानंतर दोघेही पोर्चमध्ये बसले असताना, दुपारी २ वाजेच्या सुमारास जयश्री वडिलांची नजर चुकवून बेपत्ता झाली. नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती न सापडल्याने वडील मधुकर केदार यांनी केज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दुसरी विद्यार्थिनीही गायबदुसरी घटना काळेगाव (घाट) येथील योगेश्वरी नंदकिशोर कोठावळे (१८) हिच्याबाबत घडली. ती 'भाऊसाहेब पाटील अध्यापक विद्यालया'त शिक्षण घेत आहे. २ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता ती कोणालाही न सांगता विद्यालयातून निघून गेली. याप्रकरणी नंदकिशोर कोठावळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नोंद केली आहे.
आळंदीत लागला सुगावाया प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, योगेश्वरी ही आळंदी येथे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीसह दोघांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती जमादार शकील शेख यांनी दिली आहे.
Web Summary : Two students from Kej, Beed district, have gone missing from their colleges within three days, causing concern among parents. One vanished while with her father, the other left without informing anyone. Police are investigating, with a lead suggesting one student is in Alandi.
Web Summary : बीड जिले के केज से दो छात्राएँ तीन दिनों में अपने कॉलेजों से लापता हो गई हैं, जिससे माता-पिता चिंतित हैं। एक पिता के साथ गायब हो गई, दूसरी बिना बताए चली गई। पुलिस जांच कर रही है, एक सुराग से पता चलता है कि एक छात्रा आलंदी में है।