Beed Crime: ‘तू जास्तच रील्स काढतोस’, म्हणत टोळक्याकडून विद्यार्थ्याला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:45 IST2025-11-27T16:41:25+5:302025-11-27T16:45:02+5:30
मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

Beed Crime: ‘तू जास्तच रील्स काढतोस’, म्हणत टोळक्याकडून विद्यार्थ्याला मारहाण
पाटोदा : ‘तू जास्तच रील्स काढतोस,’ असे म्हणत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलास लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना पाटोदा तालुक्यातील रायमोह येथील मतिमंद विद्यालयाच्या गेटबाहेर घडली. या प्रकरणी पाच ते सहा अल्पवयीन मुलांविरुद्ध बुधवारी सायंकाळी तक्रार देण्यात आली आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शिरूर कासार तालुक्यातील रायमोह येथे २३ नोव्हेंबर रोजी अल्पवयीन मुलास ‘तू जास्तच रील्स काढतोस,’ अशी विचारणा करीत पाच ते सहा विद्यार्थ्यांच्या टोळक्याने गावातील मतिमंद विद्यालयाच्या गेटबाहेर काढून बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडीओमध्ये सहा अल्पवयीन विद्यार्थी एका अल्पवयीन विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. या प्रकरणी बुधवारी पाटोदा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.