शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये हुंड्यासाठी पत्नीचा छळ करून गर्भपात; 'तलाक' देत घराबाहेर काढले, दागिने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:57 IST

आईसमोरच गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न; या प्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा

बीड : माहेरून ५ लाख रुपये आणण्यासाठी एका २६ वर्षीय विवाहितेचा अमानुष छळ करून, तिचा गर्भपात घडवून आणत पतीने चक्क ‘मै तुम्हे तलाक देता हूँ...’ म्हणत तिला घराबाहेर काढले. याप्रकरणी कडा पोलिस चौकीत पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तब्बोसूम गुलामरसूल शेख (वय २६) यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी गेवराई येथील गुलामरसूल इब्राहीम शेख याच्याशी मुस्लीम रीतीरिवाजाप्रमाणे झाला होता. लग्नात माहेरच्यांनी ऐपतीप्रमाणे दागिने आणि संसारोपयोगी वस्तू दिल्या होत्या. मात्र, लग्नानंतर सहा महिने चांगले वागवल्यानंतर सासरच्या मंडळींनी आपला खरा चेहरा दाखवला. "तू वांझोटी आहेस, पांढऱ्या पायाची आहेस," असे टोमणे मारत तिला उपाशीपोटी ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला.

पाच लाखांसाठी दिला 'गर्भपाता'चा त्रासपीडितेने जबाबात नमूद केलेला प्रकार अंगावर शहारे आणणारा आहे. तिला यापूर्वी गर्भ राहिला असता पतीने जबरदस्तीने गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात केला. आता पुन्हा दीड महिन्यांची गर्भवती असताना, पतीने तिला "तुला मूलबाळ होऊ देणार नाही, तुला फक्त कामासाठी आणले आहे," असे म्हणत पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. "गाडी घेण्यासाठी तुझ्या बापाकडून ५ लाख रुपये घेऊन ये," असा तगादा सासरच्यांनी लावला होता.आईसमोर गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न१५ मार्च रोजी पीडितेच्या आईने सासरी येऊन विचारणा केली की, "मुलगी गरोदर आहे, तिला दवाखान्यात का नेत नाही?" याचा राग येऊन पती गुलामरसूल, सासू अहेमदबी आणि नणंद आयेशा यांनी पीडितेचे हात दाबून धरले, तर पतीने तिचा गळा दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सासरे आणि नंदावा यांनी घराचा दरवाजा लावून घेत माय-लेकीला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

'तलाक' देऊन दागिने घेतलेपतीने पीडितेला “मै तुम्हे तलाक देता हूँ, तलाक देता हूँ, तलाक देता हूँ” असे तीन वेळा म्हणून बेकायदेशीररीत्या तलाक दिला. त्यानंतर तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत तिला घराबाहेर हाकलून दिले....यांच्यावर झाला गुन्हा दाखलपीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुलामरसूल इब्राहीम शेख (पती), अहेमदबी इब्राहीम शेख (सासू), इब्राहीम मोहम्मद शेख (सासरा), आशिया मौजम सय्यद (नणंद), मौजम सय्यद (नंदावा) यांच्याविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारी