बीडमध्ये मित्रानेच घेतला मित्राचा जीव; किरकोळ वादातून घडला खूनाचा थरार, आरोपी फरार!

By सोमनाथ खताळ | Updated: September 3, 2025 11:31 IST2025-09-03T11:29:18+5:302025-09-03T11:31:07+5:30

बीडमध्ये खळबळ! मध्यरात्रीच्या वादातून चाकूने वार करून तरुणाची हत्या

Beed Crime: Friend killed friend over minor dispute in Beed | बीडमध्ये मित्रानेच घेतला मित्राचा जीव; किरकोळ वादातून घडला खूनाचा थरार, आरोपी फरार!

बीडमध्ये मित्रानेच घेतला मित्राचा जीव; किरकोळ वादातून घडला खूनाचा थरार, आरोपी फरार!

बीड : शहरातील महाराणा प्रताप चौकात मंगळवारी मध्यरात्री एका किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या झाली आहे. विजय काळे (वय ३०, रा. धारूर) असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याच्याच मित्राने छातीत चाकूने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय काळे आणि त्याचा मित्र मंगळवारी रात्री महाराणा प्रताप चौकात एकत्र होते. त्यांच्यात काही किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी मित्राने रागाच्या भरात विजयच्या छातीत चाकूने वार केले. विजयच्या डाव्या बाजूला गंभीर जखम झाली. 

घटनेनंतर विजयला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. या घटनेमुळे बीड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Beed Crime: Friend killed friend over minor dispute in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.