जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांची औरंगाबाद महापालिका आयुक्तपदी बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 07:26 PM2019-12-04T19:26:57+5:302019-12-04T19:30:02+5:30

प्रेरणा देशभ्रतार बीडच्या नवीन जिल्हाधिकारी

Beed Collector astikkumar pande appointed as Aurangabad Municipal Commissioner | जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांची औरंगाबाद महापालिका आयुक्तपदी बदली

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांची औरंगाबाद महापालिका आयुक्तपदी बदली

googlenewsNext

बीड : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची बदली बुधवारी झाली. त्यांची नियुक्ती औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त या पदावर करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर प्रेरणा देशभ्रातार या बीडच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बीडच्या या पहिल्या महिला जिल्हाधिकारी असणार आहेत. यासंदर्भातील आदेश अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बुधवारी काढले आहेत.

२१ फेब्रुवारी २०१९ रोजी आस्तिककुमार पांडे यांची नियुक्ती बीड येथे जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली होती. अवघ्या ९ महिने ८ दिवसाच्या कार्यकाळामध्ये विविध लोकउपयोगी निर्णय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी घेतले. यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे जिवनमान उंचावणे, बँकांकडून शेतकऱ्यांना चांगली वागणूक मिळावी व त्यांना अनुदानाची रक्कम तात्काळ मिळावी यासाठी सूचना दिल्या होत्या याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर १ हजार टँकर व ६०० पेक्षा अधिक चारा छावण्यांचे योग्य नियोजन केले. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील नागरिकांना आणि पशुधनास दिलासा मिळाला. भ्रष्टाचार करणाऱ्या छावणीचालाकांवर राजकीय हस्तक्षेप न जुमानता कारवाई केली होती. यामुळे शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचारास आळा बसला होता. मागील काही दिवसात ‘या आपले शहर घडवूया’ हा उपक्रम सुरु करण्यात आला होता. यामाध्यमातून शहरातील स्वच्छता मोहिम त्यांनी हाती घेतली होती. यासह त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे शेतकरी व नागिरकांमधून त्यांच्या कामाचे कौतुक केले जात होते. 

लोकसभा व विधानसभा निवडणुका नियोजनबद्ध
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय हे यांची बदली झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीचे कामकाज सुरु झाले होते. त्याचे योग्य नियोजन करुन शांतते निवडणुका पार पाडल्या. त्यानंतर विधानसभा निवडणूक प्रक्रिया देखील सर्व मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखत शांततेत पार पडली.

Web Title: Beed Collector astikkumar pande appointed as Aurangabad Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.