Beed: ज्ञानराधा घोटाळ्यात अर्चना कुटेस केजमध्ये पोलीस कोठडी, लाखोंची बीएमडब्ल्यू जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:24 IST2025-09-18T13:22:52+5:302025-09-18T13:24:11+5:30
छत्रपती संभाजीनगर सीआयडीच्या पथकाने अर्चना कुटेला पुणे येथे ताब्यात घेतले आहे.

Beed: ज्ञानराधा घोटाळ्यात अर्चना कुटेस केजमध्ये पोलीस कोठडी, लाखोंची बीएमडब्ल्यू जप्त
केज : ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या घोटाळा प्रकरणी संचालक अर्चना कुटेस सीआयडीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, केजमधील गुन्ह्यांच्या संदर्भात बुधवारी केज पोलीस ठाण्यात अर्चना कुटेस आणण्यात आले. केज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कुटेस 3 दिवसांची पोलीस कोठडीत सुनावली.
छत्रपती संभाजीनगर सीआयडीच्या पथकाने अर्चना कुटेला पुणे येथे ताब्यात घेतले आहे. त्यानंतर केज तालुक्यात ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या विरोधात दाखल झालेल्या 2 गुन्ह्याच्या संदर्भात अर्चना कुटेला बुधवारी (दि. 17 ) पहाटे 4 वाजता येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान त्यांना केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. केज न्यायालयाने अर्चना कुटेला दि. 19 सप्टेंबर पर्यंत 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
लाखोंची बीएमडब्ल्यू जप्त
अर्चना कुटे वापरत असलेली बीएमडब्ल्यू कंपनीची महागडी दुचाकी तीन दिवसांपूर्वीच सीआयडीच्या पथकाने जप्त केली आहे. ती दुचाकी केज पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्याचे पोलीस सूत्राने सांगितले.