शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

लोकाभिमुख प्रशासन निर्मितीसाठी ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:32 IST

बीड जिल्हा परिषदेत कार्यशाळा बीड : ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियानामुळे सुधारणा व उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल, असे मत बुधवारी ...

बीड जिल्हा परिषदेत कार्यशाळा

बीड : ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियानामुळे सुधारणा व उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल, असे मत बुधवारी येथील जिल्हा परिषदेच्या कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील ‘सुंदर माझे कार्यालय’ या कार्यालयाच्या सर्वांगीण सुधारणांबाबतच्या अभियानाची सुरुवात उपआयुक्त (आस्थापना) सुरेश बेदमुथा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना उपआयुक्त सुरेश बेदमुथा यांनी अभियानाचा उद्देश, अभियानात करावयाची स्वच्छतेची कामे, कार्यालयीन सुधारणा, लोकाभिमुख कार्यपद्धती इ. बाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार म्हणाले की, जिल्हा परिषदेत कर्मचारी कल्याण अभियान पूर्वीपासूनच राबविले जात असून, त्याद्वारे प्रलंबित कामकाजाचा निपटारा जलदगतीने करणे शक्य होत आहे, तसेच जिल्हा परिषदअंतर्गत कार्यालयांना कार्यालयीन कामकाजात सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी सूचना दिलेल्या असून, सुधारणेच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. ‘ सुंदर माझे कार्यालय’ अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद मनापासून प्रयत्न करीन आणि लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासन निर्माण होण्यासाठी त्यामुळे मदत होईल, असे ते म्हणाले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी शासकीय कार्यालय हे स्वत:चे घर समजून कार्यालयात स्वच्छता राखण्याचे व चांगले कामकाज करण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, दत्तात्रय गिरी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जटाळे, तसेच जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख व गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी आभार मानले.

लोकाभिमुख प्रशासन निर्माण करता येईल

शासकीय कर्मचारी हे त्यांच्या दैनंदिन वेळेच्या एकतृतीयांश वेळ कार्यालयात असतात. या वेळेत त्यांनी शासकीय कार्यालय हे माझे कार्यालय आहे, या भावनेने काम केल्यास कार्यालयीन कामात शिस्त, नीटनेटकेपणा येऊन कार्यालयीन सुधारणा होतील व काम करण्यास उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल. अभियानाद्वारे शासकीय कार्यालयात स्वच्छता, कार्यालयीन कामकाजात आधुनिकीकरण, प्रलंबित कामांचा जलदगतीने निपटारा करणे शक्य होऊन लोकाभिमुख प्रशासन निर्माण करता येईल, असा विश्वास उपायुक्त सुरेश बेदमु‌था यांनी कार्यशाळेत व्यक्त केला.