बीडच्या मंडईत भर दिवसा पळविली व्यापाऱ्याची बॅग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 23:59 IST2019-11-24T23:58:36+5:302019-11-24T23:59:01+5:30
दुकान उघडत असताना व्यापाºयाची नजर चुकवून त्याची बॅग चोरट्याने लंबविल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शहरातील भाजीमंडई भागात घडली.

बीडच्या मंडईत भर दिवसा पळविली व्यापाऱ्याची बॅग
बीड : दुकान उघडत असताना व्यापाºयाची नजर चुकवून त्याची बॅग चोरट्याने लंबविल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शहरातील भाजीमंडई भागात घडली. दिवसाढवळ््या झालेल्या या बॅग चोरीमुळे व्याऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
येथील भाजी मंडईमध्ये रियाजोद्दीन सय्यद हाफिजोद्दीन यांचे पैसे हस्तांतरण काउंटर तसेच मोबाईल शॉपी संयुक्त आहे. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे रियाजोद्दीन हे त्यांचे दुकान उघडण्यासाठी आले होते. यावेळी जवळपास १ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग त्यांनी गाडीच्या हॅन्डलला अडकवलेली होती. शटरला लावलेले कुलूप उघडताना रियाजोद्दीन हे व्यस्त असल्याचे पाहून पाळत ठेऊन असलेल्या चोरट्याने कोणाला काही कळण्यापुर्वीच बॅग घेऊन पोबारा केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या माध्यमातून चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान आपली बॅग चोरीला गेल्याचे लक्षात येताच रियाजोद्दीन यांनी तात्काळ शहर पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात उशिरा अज्ञाात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही आधारे चोरट्याचा शोध घेणे सुरु आहे अशी माहिती सपोनि सुरेश खाडे यांनी दिली.