बाभळगावचे सरपंच लाटे अतिक्रमण प्रकरणात अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:54 IST2019-11-30T23:54:28+5:302019-11-30T23:54:48+5:30
माजलगाव तालुक्यातील बाभळगाव ग्रामपंचायतचे सरपंच दत्तात्रय राजेसाहेब लाटे यांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याने सरपंच पदावरुन अपात्र ठरले आहेत.

बाभळगावचे सरपंच लाटे अतिक्रमण प्रकरणात अपात्र
गंगामसला : माजलगाव तालुक्यातील बाभळगाव ग्रामपंचायतचे सरपंच दत्तात्रय राजेसाहेब लाटे यांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याने सरपंच पदावरुन अपात्र ठरले आहेत.
बाभळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून दत्तात्रय राजेसाहेब लाटे हे सरपंच म्हणून निवडून आले होते. गावातीलच इंद्रजीत नामदेव लाटे यांनी सरपंच लाटे यांनी बाभळगाव येथील सार्वजनिक जागेवर अतिक्र मण करून दोन मजली बांधकाम केल्याने त्यांना सरपंच पदापासून अपात्र ठरविण्यासाठी १२ आॅक्टोबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचे न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणात लाटे यांच्याविरुध्द सबळ पुरावा आल्याने व अर्जदरातर्फे केलेला अंतिम युक्तिवाद ग्राह्य धरून लाटे यांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सरपंच पदापासून अपात्र असलेबाबतचा आदेश पारित केला.
सदर प्रकरणात अर्जदारातर्फे अॅड. विनायकराव लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड.आर.के. गवते यांनी अंतिम युक्तिवाद केला. त्यांना अॅड. मन्मथ लांडगे, अॅड. एल.बी. गवते, अॅड.एस.ए. राऊत यांनी सहकार्य केले.