शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

मातंग समाजाच्या आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या तरुणाचे शवविच्छेदन औरंगाबाद येथे इन कॅमेरा होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 12:19 PM

नातेवाईकांनी संजयचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याची मागणी केली होती.

ठळक मुद्देमातंग समाजाला एससी प्रवर्गातील १३  टक्के आरक्षणातूनच लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावेअडीच मिनिटांचा व्हिडिओ; फडणवीस सरकारचे डोळे उघडण्यासाठी जलसमाधी

बीड : मातंग समाजाला लोकसंख्येप्रमाणे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी केज तालुक्यातील संजय ताकतोडे या तरूणाने जलसमाधी घेतल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. त्यानंतर नातेवाईकांच्या मागणीनूसार आज सकाळी मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात नेण्यात आला आहे.

मातंग समाजाला एससी प्रवर्गातील १३  टक्के आरक्षणातूनच लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे, या मागणीसाठी ३५ वर्षीय संजय ताकतोडे याने बिंदुसरा तलावात जलसमाधी घेतल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी समोर आली. संजय हा केज तालुक्यातील साळेगाव येथेच दुध डेअरी चालवितो. त्याचा भाऊ हनुमंत हा लहुजी शक्तिसेनेचा जिल्हाध्यक्ष आहे. सोमवारी रात्री संजय हा घरातून निघून गेला होता. मंगळवारी सकाळी बीड तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरणाच्या काठावर व्यायामासाठी गेलेल्या तरूणांना एक बॅग आणि त्यामध्ये मोबाईल सापडला. त्यांनी याची तपासणी केली. संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. बीड ग्रामीण पोलिसांनी धाव घेत मृतदेहाची शोध मोहीम हाती घेतली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास मृतदेह गळ टाकून बाहेर काढण्यात आला. रूग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रूग्णालयात दुपारच्यावेळी आणला. त्यावेळी नातेवाईकांनी गर्दी केली होती. तसेच विविध संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही रुग्णालयात आले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रुग्णालयात तगडा बंदोबस्त होता. ग्रामीण ठाण्याचे सपोनि शितलकुमार बल्लाळ, पोउपनि प्रदीप डोलारे, पोह कैलास ठोंबरे, लक्ष्मण जायभाये, आर.एच.भंडाणे, अमोल येळे, सफौ दिनकर एकाळ, शेख खय्यूम आदी कर्मचारी येथे बंदोबस्तावर आहेत. 

दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी संजयने स्वता:च्या मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार केला आहे. यामध्ये त्याने आरक्षणासह विविध मागण्या सरकारकडे केल्या आहेत. जवळपास अडीच मिनिटांचा हा व्हिडीओ आहे. मोबाईल बॅगमध्ये ठेवून त्याने जलसमाधी घेतली. विशेष म्हणजे मोबाईलच्या कव्हरमध्येही त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यामध्ये शेवटची आठवण म्हणून हे साहित्य माझ्या कुटूंबियांना द्या, अशी विनंती त्याने चिठ्ठीत केली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजयी असा परिवार आहे. 

नातेवाईकांचा आक्रमक पवित्रासंजयने व्हिडीओमध्ये ज्या मागण्या केल्या आहेत. त्या पूर्ण कराव्या, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. यानंतर नातेवाईकांनी संजयचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याची मागणी केली होती. यानुसार शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे आणण्यात आला आहे. 

अडीच मिनिटांचा व्हिडिओ; फडणवीस सरकारचे डोळे उघडण्यासाठी जलसमाधीसंजयने मृत्यपूर्वी २.२५ सेकंदाचा व्हिडीओ तयार केला आहे. त्यामध्ये तो म्हणतोय... जय लहुजी, वंदे मातरम. मी संजय ताकतोडे. फडणवीस सरकार आपणास विनंतीपूर्वक विचारतो की, मातंग समाज कित्येक वर्षापासून स्वतंत्र आरक्षणासाठी लढत आहे. स्वतंत्र आरक्षण म्हणजे आमच्या मातंग समाजाला एससीमध्ये जे काही १३ टक्के आरक्षण आहे. त्या १३ टक्क्यांमधून मातंग समाजाला लोकसंख्येनुसार आरक्षण द्या. त्यांच्या मागणीसाठी कित्येक वर्ष झाले. मातंग समाज मोर्चे काढतो, अर्धनग्न मोर्चे काढले, हालगी मोर्चा काढला, आसूड मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये आमच्या समाजाने लाठ्या-काठ्याही खाल्ल्या. तरीही फडणवीस सरकारला आमच्या समाजाविषयी दया, माया का येईना. मातंग समाज भारताच्या किंवा राष्ट्राच्या , गाव संरक्षणासाठी प्रत्येक ठिकाणी अग्रेसर असून व समाजाचे राष्ट्राप्रती प्रेम असून, या मातंग समाजाची का दखल घेतली जात नाही.? आता तर त्याच्यापुढे जाऊन नागपूर ते मुंबई मातंग समाजातील काही समाजसेवकांनी मोटारसायकल महारॅली काढली. त्याच्यापुढे जाऊन मातंग समाजाने फडणवीस सरकार तुमच्या समोर अकोल्यामध्ये लोटांगण घेतलं. यामध्ये लहानथोर, वृद्ध सगळेच होते. अनेकांच्या शरीराचे तर सालटे निघले. एवढे असूनसुद्धा मातंग समाजाची दखल का घेतली जात नाही? मातंग समाज गद्दार आहे का, मातंग समाज देशसेवेसाठी झोकून दिलेला आहे. त्या लहुजी साळवेंनी देशाच्या संरक्षणासाठी प्राणत्याग केला. आयुष्यभर लग्न नाही केल. म्हणून त्या समाजाला असे केले. मुंबईमध्ये अण्णा भाऊ साठेंनी मुंबईसाठी मोर्चे काढले. आंदोलने केले. अण्णा भाऊंनी शाळा शिकून समाज जागृत केला. समाजाला सत्य सांगितले. मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी समाजप्रबोधन केले, ही मातंग समाजाची चूक आहे का? मातंग समाज फक्त आम्हाला जे १३ टक्के आरक्षण आहे. त्यातली आमच्या लोकसंख्येनुसार आमची भाऊवाटणी भेटावी, याच्यादृष्टीने हे सर्व प्रयत्न करतोय. एवढे करुनही फडणवीस सरकारचे आमच्याविषयी डोळे उघडेनात म्हणून फडणवीस सरकार मी संजय ताकतोडे बीड जिल्हा तालुका केज येथून बोलतो आहे. मी आपल्या सरकारचे, फडणवीस सरकारचे डोळे उघडण्यासाठी जलसमाधी घेत आहे. आतातरी आमच्या समाजाविषयी प्रेम दाखवा. डोळे उघडा आणि आमच्या समाजाला आमचा हक्क आणि न्याय द्या. हे आपणाला मन:पूर्वक विनंती करतो. जय लहुजी, वंदे मातरम्.

टॅग्स :reservationआरक्षणSuicideआत्महत्याgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीBeedबीड