सासूला मारहाण करीत पेटवण्याचा प्रयत्न; जावयाविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 01:05 AM2020-01-06T01:05:55+5:302020-01-06T01:06:11+5:30

गिरवली येथे जावयाने सासूला मारहाण करुन दगडाने तिचे डोके फोडले. तसेच अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३ जानेवारी रोजी घडली

Attempts to burn mother-in-law | सासूला मारहाण करीत पेटवण्याचा प्रयत्न; जावयाविरुध्द गुन्हा दाखल

सासूला मारहाण करीत पेटवण्याचा प्रयत्न; जावयाविरुध्द गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : तालुक्यातील गिरवली येथे जावयाने सासूला मारहाण करुन दगडाने तिचे डोके फोडले. तसेच अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी सासूने दिलेल्या तक्रारीवरुन जावयाविरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत उर्फ महादेव दिगंबर करपे (रा. जवळबन ता. केज ह.मु लातूर) असे अटक केलेल्या जावयाचे नाव आहे. त्याला दारुचे व्यसन असल्याने पत्नी आणि त्याच्यात सतत वाद होत असत. याला कंटाळून मागील दहा महिन्यांपासून प्रशांतची पत्नी माहेरी गिरवली येथे आई वडिलांकडे राहत आहे.
दरम्यान, गरिवली येथे सासरच्या घरी येऊन प्रशांत नेहमी दारू पिऊन पत्नीला नांदायला चल म्हणून गोंधळ घालतो. तसेच सासरच्या मंडळींना शिवीगाळ करतो. यापुर्वी त्याने सासरच्या घरावर दगडफेक देखील केली होती. त्यानंतर याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा ३ जानेवारी रोजी प्रशांत हा दारूच्या नशेत गिरवली येथे आला. त्यानंतर त्याने पत्नीला नांदायला पाठवा म्हणत सासरवाडीच्या मंडळींना शिवीगाळ केली. सासू रमाबाई शहाजी आपेट (वय ६०) या घराबाहेर येऊन जावयाला समजावत होते. यावेळी जावयाने रमाबाई यांना दगडाने मारहाण करुन त्यांचे डोके फोडले आणि त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यावेळी इतर मंडळींनी प्रशांतला थांबवले त्यामुळे काही पुढील घटना टळली.
या प्रकरणी रमाबाई शहाजी आपेट यांनी बर्दापूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन जावई प्रशांत उर्फ महादेव दिगंबर करपे याच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
७ जानेवारीपर्यंत कोठडी
या प्रकरणातील जावई प्रशांत उर्फ महादेव याला पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता, ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पो. नि. लक्ष्मण केंद्रीय हे करीत आहेत.

Web Title: Attempts to burn mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.