राजस्थानमध्ये जैनमुनींसह श्रावकांवर ट्रक चालवून जिवे मारण्याचा प्रयत्न; जैन समाजात तीव्र पडसाद
By अनिल भंडारी | Updated: January 17, 2024 17:50 IST2024-01-17T17:48:03+5:302024-01-17T17:50:33+5:30
व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर बीडमध्ये जैन समाजाची आज बैठक

राजस्थानमध्ये जैनमुनींसह श्रावकांवर ट्रक चालवून जिवे मारण्याचा प्रयत्न; जैन समाजात तीव्र पडसाद
बीड : राजस्थानमधील पाली येथे जैन साधू विहार करीत असताना समाजकंटक व गुंड लोकांनी ट्रक घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत बरेच श्रावकही जखमी झाले आहेत. त्याचा व्हिडिओ सध्या सर्व जैन समुदायांच्या ग्रुपवर व्हायरल झाला आहे. त्यानंतर या घटनेचे जैन समाजात तीव्र पडसाद उमटत आहेत.
ही घटना जैन धर्मावर व त्यांच्या अनुवायावर आघात करणारी आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी सकल जैन समाजातर्फे बीड येथील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यासंदर्भात श्रावक संघ बीडची तातडीची बैठक आज १७ जानेवारी रोजी रात्री आठ वाजता जैन भवन येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व धर्मप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन बीड श्रावक संघाने केले आहे.