Attempt to break SBI's branch at Kada failed | कडा येथे एसबीआयची शाखा फोडण्याचा प्रयत्न फसला

कडा येथे एसबीआयची शाखा फोडण्याचा प्रयत्न फसला

ठळक मुद्देसकाळी शिपाई आला असता त्याला कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले

कडा : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा बुधवारी रात्री ११.१५ वाजेच्या दरम्यान फोडण्याच्या प्रयत्न चोरट्यांनी केला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

कडा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखे अंतर्गत बावीस गावाचा कारभार येतो. बुधवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास एका चोरटय़ाने बंद गेटवरून उडी घेत बँक आवारात प्रवेश केला. बँकेच्या दरवाज्या समोरील लोखंडी गेटचे कुलुप चोरट्याने तोडले. काही वेळ तिथेच भरकटल्यानंतर क अनेक प्रयत्न केल्यानंरही त्याला बँकेत प्रवेश करता आला नाही. यानंतर चोरट्याने तेथून पलायन केले.  गुरुवारी सकाळी शिपाई बाळासाहेब बोकेफोड साफसफाई करण्यासाठी बँकेत आले असता त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. 
 

Web Title: Attempt to break SBI's branch at Kada failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.