बीडमध्ये सामाजिक कार्यकर्ते पंडित तुपे यांच्यावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 17:08 IST2020-04-09T17:06:41+5:302020-04-09T17:08:24+5:30
पंडित तुपे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य आहेत

बीडमध्ये सामाजिक कार्यकर्ते पंडित तुपे यांच्यावर प्राणघातक हल्ला
ठळक मुद्देतुपे यांना गंभीर जखमी करून हल्लेखोर पसारगुरुवारी दुपारी ४ वाजता झाला हल्ला
बीड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा सामाजिक व चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते प्राध्यापक पंडित तुपे यांच्यावरती पिंपळवंडी या त्यांच्या गावी दुपारी ४ वाजता हल्ला करण्यात आला आहे. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान, हल्ला करणारे पसार झाले असून याबाबत पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी होत आहे. ( सविस्तर बातमी लवकरच )