आरोग्यसेविकेवर खांडवीत अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:11 IST2019-01-02T00:11:17+5:302019-01-02T00:11:40+5:30

तालुक्यातील खांडवी येथील एका ३६ वर्षीय आरोग्य सेविकेवर २० वर्षीय तरूणाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरूणावर गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याच्या शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Atrocities on healthcare | आरोग्यसेविकेवर खांडवीत अत्याचार

आरोग्यसेविकेवर खांडवीत अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील खांडवी येथील एका ३६ वर्षीय आरोग्य सेविकेवर २० वर्षीय तरूणाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरूणावर गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याच्या शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
कृष्णा भिकाजी नाईकवाडे (२० रा.खांडवी) असे आरोपीचे नाव आहे. पीडित सेविका या खांडवी आरोग्य केंद्रात कर्तव्य बजावतात. कृष्णाने त्यांचा कपडे बदलतानाचा फोटो काढला होता. त्यानंतर त्याने त्यांच्याकडून पाच लाख रूपयेही उकळले. त्यानंतरही त्याने माघार न घेता वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला. दिवसेंदिवस कृष्णाचा अत्याचार वाढत चालल्याने पीडितेने हा प्रकार पतीस सांगितला. त्यानंतर मंगळवारी गेवराई पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्याप्रमाणे कृष्णाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि आर.के.तडवी हे करीत आहेत. आरोपी अद्यापही फरार असून लवकरच त्याला ताब्यात घेऊ, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Atrocities on healthcare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.