शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
2
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
3
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
4
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
5
आता काय बॉउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
6
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
7
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
8
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
9
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
10
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
11
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
12
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
13
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
14
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
15
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
16
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
17
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
18
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
19
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
20
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...

पंचविशीतच दारुमाफियाचे बिरूद, कुख्यात रोहित चव्हाण हर्सूल कारागृहात स्थानबध्द

By संजय तिपाले | Updated: January 6, 2023 12:33 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देताच पोलिसांनी सापळा रचून रात्रीच उचलले

बीड: बनावट दारु तयार करुन लोकांच्या जिवाशी खेळणारा कुख्यात माफिया रोहित राजू चव्हाण (२५,रा.नवनाथनगर, एमआयडीसी, बीड) याच्यावर एमपीडीएनुसार (झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा) कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ५ जानेवारीला रात्री उशिरा ताब्यात घेऊन त्यास पोलिसांनी औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात ६ रोजी पहाटे स्थानबध्द केले.

बनावट दारुचा कारखाना थाटून रोहित चव्हाणने वयाच्या बाविशीतच पोलिस यंत्रणेला आव्हान दिले होते. कायम स्थळ बदलून कारखाना उभारुन बनावट दारु तयार करत विक्री करण्याचा सपाटा त्याने लावला होता. अटकेनंतर जामिनावर सुटताच त्याने वारंवार बनावट दारुचे गुन्हे केले. मानवी शरीरास दुखापत पोहोचेल असे विषारी द्रव बनविल्याप्रकरणी कलम ३२८ नुसार त्याच्यावर एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव बीड ग्रामीण ठाण्याचे पो.नि. संतोष वाळके यांनी पाठवला होता. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यामार्फत प्रस्ताव २ जानेवारीला जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना सादर झाला. शर्मा यांनी ५ जानेवारी रोजी प्रस्ताव मंजूर केल्यावर रात्री ११ वाजता बीड ग्रामीण व गुन्हे शाखेने संयुक्तरीत्या त्यास राहत्या घरातून उचलले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर त्यास औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात पाठविण्यात आले. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक संतोष वाळके, गुन्हे शाखा निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक योगेश उबाळे, हवालदार सुनील आलगट, अंकुश वरपे, गुन्हे शाखेचे हवालदार अभिमन्यू औताडे, शेख नसीर, मनोज वाघ यांनी ही कारवाई केली.

रोहित चव्हाणचे असे आहेत कारनामेबहिरवाडी शिवारातील त्याच्या कारखान्यावर धाड टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे ८६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. अंबाजोगाई ग्रामीण, शिवाजीनगर ठाण्यातही त्याच्यावर गुन्हा नोंद आहे. दोन महिन्यांपूर्वीच बीड ग्रामीण ठाणे हद्दीतील बनावट दारु प्रकरणात रोहित चव्हाणला अटक झाली होती.

तीन पोलिस अधिकारी गोत्यातरोहित चव्हाणमुळे आतापर्यंंत तीन पोलिस अधिकारी कारवाईच्या कचाट्यात अडकले. अंबाजोगाई ग्रामीणचे तत्कालीन पो.नि. वासुदेव मोरे यांचे निलंबन झाले. पेठ बीडमध्ये रोहित चव्हाणने उपनिरीक्षक राजेंद्र बनकर यांचा वाढदिवस साजरा केल्याने त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले तर सहायक निरीक्षक केदार पालवे यांना नियंत्रण कक्षात संलग्न केले होते.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस