वय १९ वर्ष अन् बनला सराईत चोर; चोरीच्या ४ बाईकसह १२ मोबाईलचा लागला छडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 16:44 IST2022-10-20T16:43:13+5:302022-10-20T16:44:30+5:30
४ लाख ६० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकांची कामगिरी

वय १९ वर्ष अन् बनला सराईत चोर; चोरीच्या ४ बाईकसह १२ मोबाईलचा लागला छडा
गेवराई ( बीड) : गस्तीवरील डीबी पथकाने संशयावरून एका १९ वर्षीय युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता शहरातील मोबाईल आणि दुचाकी चोरींच्या घटनाचा उलगडा झाला आहे. आसाराम उर्फ रामा उद्धव बोंगाणे ( १९, भगवान नगर) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीच्या १२ मोबाईलसह ४ बाईक जप्त करण्यात आले आहे.
आसाराम आज सकाळी शहरात संशयास्पद हालचाली करत फिरत होता. यावरून गस्तीवरील डीबी पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने मोबाईल आणि बाईक चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे १२ स्मार्टफोन तसेच ४ बाईक असा तब्बल ४ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई उपअधीक्षक स्वप्नील राठोड,पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे, पोहे कृष्णा जायभाये, पोना नितीन राठोड, पोना संजय राठोड, विठ्ठल राठोड, विकी सुरवसे यांनी केली.