अपर जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देताच आष्टीत दुकाने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:33 IST2021-03-20T04:33:08+5:302021-03-20T04:33:08+5:30
आष्टी : शहरात कोविड नियमांचे पालन होत नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने गुरुवारी सायंकाळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे ...

अपर जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देताच आष्टीत दुकाने बंद
आष्टी : शहरात कोविड नियमांचे पालन होत नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने गुरुवारी सायंकाळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आष्टी शहरात अचानक प्रवेश केल्यानंतर बीड - नगर रस्त्यावरील बसस्थानकालगतची सर्व दुकाने बीअरबार, हॉटेल, विविध दुकाने उघडी दिसून आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी बसस्थानकासमोरील गोळी सेंटर व दुकानात गर्दी पाहून समज देत दुकान वेळेत बंद करण्याची सूचना केली. अपर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी जागा अपुरी पडत असल्याने आयटीआय काॅलेजची पाहणी केली व तेथे कोविड सेंटर सुरु करण्यासाठी तयारी ठेवून जी अत्यावश्यक सुविधा लागते ती तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम, पोलीस उपअधीक्षक विजय लगारे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,नायब तहसीलदार प्रदीप पाडुळे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
===Photopath===
190321\img-20210319-wa0405_14.jpg