मास्क वापरण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST2021-03-13T05:00:15+5:302021-03-13T05:00:15+5:30
शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था बीड : बीड बायपासचे काम पूर्णत्वास जाऊन दोन वर्षे उलटून गेलेली असताना शहरवासियांना लोकप्रतिनिधींनी दिलेले ...

मास्क वापरण्याचे आवाहन
शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था
बीड : बीड बायपासचे काम पूर्णत्वास जाऊन दोन वर्षे उलटून गेलेली असताना शहरवासियांना लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. बीड शहरातून जाणारा मुख्य रस्ता काम होणे अपेक्षित असताना याकडे लोकप्रतिनिधींचा कानाडोळा असल्याचे दिसते. दर्जेदार रस्ते करून वाहनधारक, नागरिकांना सुविधा द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
विद्यार्थिनींची बालग्रामला भेट
बीड : गेवराई येथील र.भ. अट्टल महिला कक्षाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सहारा बालग्राम येथे मुलींच्या आरोग्यविषयक संवाद विषयी भेट दिली. प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. महिला कक्षप्रमुख डॉ. सुदर्शना बढे, सदस्य डॉ. वृषाली गव्हाणे, अनाथालयातील सदस्य प्रिती गर्जे यांनी विद्यार्थिनी तसेच अनाथालयातील मुली यांचा संवाद घडवून आणला. मुलींच्या आरोग्यविषयक समस्यांची चर्चा झाली. सोनाली सुतार, मनिषा कापसे, अश्विनी मडेकर, सुनीता, मोहिनी आदी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.