संतापजनक ! मूकबधिर विवाहितेवर नराधमाने घरात घुसून केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 16:34 IST2021-10-05T16:34:00+5:302021-10-05T16:34:29+5:30

माजलगाव तालुक्यातील एका गावात मूकबधिर पती-पत्नी आपल्या कुटुंबीसोबत राहतात.

Annoying! A deaf and dumb married woman was raped in Beed district | संतापजनक ! मूकबधिर विवाहितेवर नराधमाने घरात घुसून केला अत्याचार

संतापजनक ! मूकबधिर विवाहितेवर नराधमाने घरात घुसून केला अत्याचार

माजलगाव (जि. बीड) : एका वीस वर्षीय मूकबधिर विवाहित महिलेवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजता तालुक्यातील एका गावात घडली.

माजलगाव तालुक्यातील एका गावात मूकबधिर पती-पत्नी आपल्या कुटुंबीसोबत राहतात. रविवार दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरातील सर्व सदस्य शेतावर गेले होते. यावेळी घरात फक्त ही वीस वर्षीय विवाहित मूकबधिर महिला होती. याचा फायदा घेत, याच गावातीलच संतोष शिवराम कवडे याने घरात प्रवेश केला व अत्याचार केला. 

काही वेळाने शेतातून परतलेल्या कुटुंबीयांना या मूकबधिर महिलेने झालेला प्रकार सांगितला. दरम्यान, पीडित महिलेच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी संतोष शिवराम कवडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात. आरोपी फरार झाला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड हे करत आहेत.

भावकीतील मुलानेच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पिडिता पाच महिन्यांची गर्भवती

Web Title: Annoying! A deaf and dumb married woman was raped in Beed district