संतापजनक! अल्पवयीन मुलीस पळवून नेत ट्रॅव्हल्समध्येच केला अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 19:38 IST2022-07-05T19:38:16+5:302022-07-05T19:38:47+5:30
लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीला पुणे येथे पळवून नेले, दोन दिवस नातेवाईकांकडे राहिल्यानंतर घरी परतल्यास उघडकीस आली अत्याचाराची घटना.

संतापजनक! अल्पवयीन मुलीस पळवून नेत ट्रॅव्हल्समध्येच केला अत्याचार
अंबाजोगाई-: येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून एकाने पुणे येथे पळवून नेले. दरम्यान, पुण्याला जात नेत असताना ट्रॅव्हल्समध्येच तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
अंबाजोगाई शहरातील जुन्या भागात राहणाऱ्या कुटुंबासमोर मनेखॉं आसेफ पठाण हा नेहमी वाईट हेतूने चकरा मारायचा.त्या कुटुंबाने मनेखॉं याचे वडील आसेफ उर्फ लड्डू पठाण यांच्याकडे तक्रार केली.या नंतर मनेखॉं याच्या चकरा बंद झाल्या होत्या.मात्र अचानक २ जुलै रोजी मनेखॉं पठाण हा त्या कुटुंबातील अल्पवयीन युवतीस पुणे येथे ट्रॅव्हल्स मध्ये घेऊन गेला.त्याने प्रवासादरम्यान त्या युवतीवर ट्रॅव्हल्समध्येच अतिप्रसंग केला. त्यानंतर दोन दिवस त्या युवतीस पुणे येथील नातेवाईकांकडे राहिला.
इकडे मुलीचा शोध घेणाऱ्या कुटुंबास आसेफ पठाण यांनी तुमची मुलगी माझ्या मुलासोबत गेली असल्याचे सांगितले. आम्ही त्यांना परत बोलवून घेतले आहे. सकाळी अंबाजोगाईत येणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये ते दोघेजण परत येणार असल्याचे सांगितले. सकाळी ते परत आल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने तिला जवळ घेऊन सर्व माहिती विचारली. यावेळी पिडीत युवतीने आपल्यावर ट्रॅव्हल्समध्येच अत्याचार झाल्याची माहिती आईला दिली. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून मनेखॉं आसेफ पठाण यांच्याविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोळवे करीत आहेत.