धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध, अंजली दमानियांचा आरोप, सात बारा दाखवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 13:09 IST2024-12-24T13:04:44+5:302024-12-24T13:09:21+5:30

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Anjali Damania's allegations about financial relations between Dhananjay Munde and Valmik Karad, seven twelve shown | धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध, अंजली दमानियांचा आरोप, सात बारा दाखवला

धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध, अंजली दमानियांचा आरोप, सात बारा दाखवला

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात या प्रकरणावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केल्या आहेत. दरम्यान, आता या प्रकरणावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी ट्विट करुन मुंडे आणि कराड यांच्या जमिनीचा सात बारा शेअर केला आहे.

“राहुल गांधी परभणीत गेले, गृहमंत्री म्हणून तुम्ही बीडला गेलात का”; राऊतांचा फडणवीसांना सवाल

मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन असल्याचा आरोप दमानिया यांनी केला. याबाबत त्यांनी डिजिटल सात बारा शेअर केला आहे. पोस्टमध्ये अंजली दमानिया म्हणाल्या की,  'धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन ! हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे. कंपनी एकत्र, जमीन एकत्र , जगमित्र शुगर्स चे ६ सातबारे मी डिजिटली डाउनलोड केले . ३५५४ गुंठे जमीन (८८ एकर ३४ गुंठे) , असंही दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये अंजली दमानिया म्हणाल्या, अंबेजोगाई तालुक्यातील एका गावात जमिन आहे. मी डिजीटल सात बारा डाऊनलोड केला आहे. यात ८८ एकर जमिन धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या नावावर दिसत आहे. या अर्थ त्यांच आर्थिक संबंध जास्त आहेत आणि यावरुनच लोकांना हे कळेल की, हे वेगळे नाहीत. त्यांच्या कंपन्या एकत्र, जमिनी एकत्र. त्यांचे व्यवहारही एकत्र. त्यांची दहशतही एकत्र, असा आरोप दमानिया यांनी केला. 

बीडमध्ये मास्टरमाईंडच्या अटकेसाठी निघणार सर्वपक्षीय मोर्चा

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला १५ दिवस उलटत आले असले तरी अद्याप तीन आरोपी फरार असल्याने जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली असून यामध्ये २८ डिसेंबर रोजी जिल्ह्यात मोर्चा काढण्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हत्या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक व्हावी, ही या मोर्चाची प्रमुख मागणी असणार आहे. 

Web Title: Anjali Damania's allegations about financial relations between Dhananjay Munde and Valmik Karad, seven twelve shown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.