- मधुकर सिरसटकेज (बीड): केज शहरातील समर्थ नगर भागातील एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने केवळ आईने खेळायला जाऊ न दिल्याच्या रागातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. प्रतीक रामेश्वर डोईफोडे असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो विवेकानंद विद्या मंदिरात ९ वीच्या वर्गात शिकत होता.
नेमकी घटना काय? रविवारची सुट्टी असल्याने सकाळी १० वाजेच्या सुमारास प्रतीकचा एक मित्र त्याला खेळण्यासाठी घरी बोलवायला आला होता. मात्र, बाहेर ऊन असल्याने आईने प्रतीकला, "आता ऊन आहे, ४ वाजल्यानंतर खेळायला जा," असे म्हणत मित्रासमोर हटकले. या गोष्टीचा राग प्रतीकच्या मनाला इतका लागला की, त्याने आई-वडिलांच्या बेडरूममध्ये जाऊन आतून कडी लावून घेतली आणि पंख्याला गळफास लावला. आई स्वयंपाकघरात कामात व्यस्त असल्याने तिचे बेडरूमकडे लक्ष गेले नाही. दुपारी दीडच्या सुमारास जेवणासाठी त्याला उठवायला गेल्यावर दरवाजा उघडला नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता प्रतीक जमिनीवर कोसळलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. रविवारी रात्री उशिरा क्रांतीनगर स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विद्यालयावर शोककळा, महिनाभरातील दुसरी घटनाधक्कादायक बाब म्हणजे, ज्या शाळेत प्रतीक शिकत होता, त्याच शाळेतील तनुजा चाटे या ९ वीच्या विद्यार्थिनीनेही २८ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. एकाच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी महिन्याभराच्या अंतरात टोकाचे पाऊल उचलल्याने शिक्षक आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुलांच्या मनातील हा वाढता राग आणि नैराश्य आता चिंतेचा विषय ठरत आहे.
Web Summary : Upset after his mother forbade him from playing outside, a 15-year-old student in Beed tragically took his own life. This is the second suicide at the same school within a month, raising concerns about student mental health.
Web Summary : बीड में खेलने से मना करने पर एक 15 वर्षीय छात्र ने गुस्से में आकर आत्महत्या कर ली। एक महीने में उसी स्कूल में यह दूसरी आत्महत्या है, जिससे छात्रों के मानसिक स्वास्थ्य को लेकर चिंता बढ़ गई है।