उपमुख्यमंत्री फडणविसांचे स्टेटस ठेवल्याचा राग; दोघांनी तरुणाला केली बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 19:42 IST2024-03-08T19:39:28+5:302024-03-08T19:42:00+5:30

या प्रकरणी दोघाविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे

Anger over Deputy Chief Minister Devendra Fadnavis' status on social media; two men beat up the young man | उपमुख्यमंत्री फडणविसांचे स्टेटस ठेवल्याचा राग; दोघांनी तरुणाला केली बेदम मारहाण

उपमुख्यमंत्री फडणविसांचे स्टेटस ठेवल्याचा राग; दोघांनी तरुणाला केली बेदम मारहाण

- मधुकर सिरसट
केज :
सोशल मिडियात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्टेट्स शेयर केल्याचे रागातून दोघांनी एका तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील लव्हुरी या गावी गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लव्हुरी येथील एका हॉटेल समोर बसलेल्या गणेश नागनाथ चाळक यास  गावातीलच राहुल सर्जेराव चाळक आणि कैलास सुरेश चाळक या दोघांनी, तु तुझ्या सोशल मीडीयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे स्टेटस का ठेवलेस?  असा जाब विचारला. यारून त्यांच्यात वाद झाला. यातूनच कैलासने लोखंडी रॉडने गणेशच्या हातापायावर मारहाण केली. तर राहुलने गणेशला जिवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्याने मारहाण केली. यावेळी अमोल इंदरराव चाळक,  नागनाथ हरिभाऊ चाळक यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.

याप्रकरणी गुरुवारी(दि.7) मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या दरम्यान पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व  त्यांच्या सहका-यांनी  गणेश चाळक याचा स्वाराति रुग्णालयात जवाब घेतला. शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान राहुल सर्जेराव चाळक व कैलास सुरेश चाळक ( दोघेही रा लव्हुरी ) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास जमादार राजू वाघमारे हे करीत आहेत.

Web Title: Anger over Deputy Chief Minister Devendra Fadnavis' status on social media; two men beat up the young man