शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

परळीत फरशी कामगाराचा विजय; महायुतीला चारीमुंड्या चित करत काँग्रेसचे 'बब्बू' नगरसेवक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:26 IST

परळीत ‘सामान्य माणसाचा’ असामान्य विजय; काँग्रेसच्या एकमेव वाघाने महायुतीला चारीमुंड्या चित केलं

परळी वैजनाथ: परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ 'अ' मधून काँग्रेसचे उमेदवार, अवघे ३२ वर्षांचे फरशी कामगार फारुख गणी सय्यद ऊर्फ बब्बू यांनी महायुतीच्या तगड्या उमेदवाराचा पराभव करत इतिहास घडवला आहे. काँग्रेसने १६ उमेदवार उतरवले होते, मात्र त्यातील केवळ 'बब्बू' हेच विजयी झाले, ही बाब त्यांच्या विजयाचे मोठेपण अधोरेखित करते.

ना पैसा, ना गाड्या... फक्त विश्वास! फारुख गणी यांचा प्रवास थक्क करणारा आहे. व्यवसायाने मिस्त्रीच्या हाताखाली काम करणारा हा तरुण, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या खांद्यावर असताना निवडणुकीच्या रिंगणात उतरला. विरोधकांकडे प्रचारासाठी गाड्यांचा ताफा आणि पैशांचे बळ असताना, बब्बू मात्र पायी चालत मतदारांच्या दारात जात होते. "मी तुमच्यातलाच एक आहे, माझ्यावर विश्वास ठेवा," ही त्यांची साधी विनंती बरकत नगर, खुदबे नगर आणि जमजम कॉलनीतील वयोवृद्ध मतदारांच्या काळजाला भिडली.

अडचणीत मिळालेली साथ सुरुवातीला या जागेवरून निवडणूक लढवण्यास कोणाकडेही धैर्य नव्हते. मात्र, काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद हनीफ (बहादूर) आणि कार्यकर्ते बदर भाई यांनी बब्बूंच्या प्रामाणिकपणावर विश्वास दाखवला. २१ डिसेंबरला लागलेल्या निकालात बब्बू यांना १२१६ मते मिळाली, तर महायुतीच्या उमेदवाराला ११४४ मतांवर समाधान मानावे लागले. ७२ मतांच्या या फरकाने परळीत एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

"जनतेची भाषा मला कळते" विजयानंतर सत्काराला उत्तर देताना बब्बू भावूक झाले. त्यांना लिहिता-वाचता येत नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी कधीही लपवली नाही. "माझ्याकडे मोठी पदवी नाही, पण माझ्या प्रभागातील जनतेच्या डोळ्यांतील पाणी वाचण्याची ताकद माझ्याकडे आहे. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी रक्ताचं पाणी करेन," अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या या विजयाने हे सिद्ध केले की, राजकारणात टिकण्यासाठी केवळ पैसाच नाही, तर 'माणुसकी'ची कमाईही महत्त्वाची असते.

विजयाचे समीकरण: एका नजरेतनाव: फारुख गणी सय्यद (बब्बू)व्यवसाय: फरशी कामगार पक्ष: राष्ट्रीय काँग्रेस (परळीतील एकमेव विजयी)मिळालेली मते: १२१६ विजयी फरक: ७२ मतेविरोधक: महायुती (शेख अजीम मुजीब)

English
हिंदी सारांश
Web Title : Parli: Tile worker 'Babbu' achieves extraordinary victory, becomes councilor.

Web Summary : Farukh 'Babbu,' a tile worker, won Parli's municipal election against a strong opponent. Despite lacking resources, his genuine connection with voters and promise to address their needs secured his victory, highlighting the power of humanity in politics.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Beedबीड