दिंद्रुड: चॉकलेट देतो म्हणून एका वयोवृद्ध इसमाने नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना (दि.२८ रोजी) रोजी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका वाडीत घडली. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून दिंद्रुड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीस तात्काळ जेरबंद करत बीड जिल्हा कारागृहात त्याची रवानगी केली.
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार,धारूर तालुक्यातील एका वाडीत एक शेतमजूर कुटुंब राहते. त्यांची इयत्ता चौथीत शिकणारी नऊ वर्षीय मुलगी दि.28 रोजी सकाळी शाळेत जात असताना, मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली. रस्त्यातच आरोपी बाबुराव केरबा निरडे याने तिला चॉकलेट देतो म्हणून घरात बोलावून घेतले. घराची कडी लावून मुलीच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिच्यावर अत्याचार केला.
मुलगी इतकी घाबरली की, तिने सुरुवातीला कोणालाच काही सांगितले नाही. तशाच अवस्थित ती शाळेत गेली. पण, घरी आल्यापासून शांत शांत राहत असल्याने दुसऱ्या दिवशी आईला संशय आला. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता, तिने घडलेली सर्व आपबिती सांगितली. यानंतर तात्काळ कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
या किळसदायक घटनेत दिंद्रुड पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (बी.एन.एस)२०२३ व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत विविध कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत अंबाजोगाई येथून फरार आरोपीस जेरबंद केले असून, सेशन कोर्टात दाखल करत आरोपी बाबुराव निरडेची बीड जिल्हा कारागृहात रवानगी केल्याची माहिती सपोनि महादेव ढाकणे यांनी दिली आहे.
Web Summary : A nine-year-old girl was sexually assaulted in Majalgaon after being lured with chocolate. Police arrested the accused, Baburao Nirade, and he has been sent to Beed jail.
Web Summary : माजलगाँव में एक नौ वर्षीय लड़की को चॉकलेट का लालच देकर यौन उत्पीड़न किया गया। पुलिस ने आरोपी बाबुराव निरडे को गिरफ्तार कर लिया है और उसे बीड जेल भेज दिया गया है।