सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंची गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

By सोमनाथ खताळ | Published: February 22, 2024 01:15 PM2024-02-22T13:15:10+5:302024-02-22T13:25:53+5:30

हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आष्टी पोलीस ठाण्यात सुरू आहे.

An attempt was made to burn the car of social worker Ram Khade with petrol in ashti beed | सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंची गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंची गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

अविनाश कदम

बीड (आष्टी) - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांची गाडी पेट्रोल टाकून जाळण्याची घटना दि.२१ रोजी मध्यरात्री घडली असून संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.पो.नि.संतोष खेतमाळस यांची घटनास्थळाची पाहणी केली असुन सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी त्यांच्याकडे घेतले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ खाडे यांचे स्कार्पिओ वाहन क्र.MH23AS3044 क-हेवडगांव‌ येथील राहत्या घरी पार्क केलेली असताना अज्ञात ४ व्यक्तींनी २२ फेब्रुवारी २०२४ रोजी १ वाजुन २० मिनीटे ५१ सेकंदाने तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चौघांनी गाडीवरती ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला व जाताना गाडीच्या काचेवर दगड फेकून मारल्याने आवाज झाला व त्यांचे बंधू जागे झाले असता मोठी आग लगलेली होती.मग सर्वच कुटुंब जागे झाले व या आगीवर पाणी टाकून नियत्रणात आणली, तोपर्यंत दुचाकीवरून आलेल्या चौघांनी पोबारा केला होता. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आष्टी पोलीस ठाण्यात सुरू आहे.

Web Title: An attempt was made to burn the car of social worker Ram Khade with petrol in ashti beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.