शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

८३ वर्षाचा योद्धा आर्शीर्वाद मागायला आलाय, आधार देऊ; शरद पवारांसमोर राजेश टोपे भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 16:21 IST

बीडमध्ये आज राष्ट्रवादीची स्वाभीमानी सभा होतं आहे.

बीड-  राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. या फुटीनंतर खासदार शरद पवार पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर गेले आहेत, बीडमध्ये आज राष्ट्रवादीची स्वाभीमानी सभा होतं आहे. या सभेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यांची उपस्थिती आहे. यावेळी बोलताना माजी मंत्री राजेश टोपे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

कुणीही इकडं तिकडे गेले तरी..; आमदार संदीप क्षीरसागर धनंजय मुंडेंवर जोरदार बरसले

बीडमधील सभेत बोलताना आमदार राजेश टोपे यांनी भावूक होऊन बीडमधील कार्यकर्त्यांना साद घातली. आमदार राजेश टोपे म्हणाले,  शरद पवार यांच उभं आयुष्य विचारांचं राजकारण केलं आहे, त्यांनी बाबासाहेब आंबडकर यांच्या मुल आधारावर काम केलं. ज्या तत्वासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं. तिच विचारधारा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण इथे जमलो आहोत, पवार साहेबांनी सर्वांसाठी काम केलं. कितीही संकट आली तरीही त्यांनी काम केलं. म्हणून शरद पवार साहेबांसोबत आज आपण रहायचे आहे, असंही टोपे म्हणाले.

'पवार साहेबांना तुमच्या सर्वांच्या आधाराची गरज आहे. आज ८३ वर्षांचा योद्धा एक विचारांची बांधीलकी घेऊन आपला आर्शीर्वाद मागायला आले आहेत, तो आर्शीर्वाद आपण देऊया, असं भावूक होऊन आवाहन आमदार टोपे यांनी केलं. 

 'शिंदे-फडणवीस सरकारकडून अनेक आश्वासने देण्यात आली, पण अजुनही पूर्ण केलेली नाही. आपल्याला या सरकारने वाळू ६५० रुपयांना देतो म्हणून सांगितलं पण अजुनही एवढ्या पैशात मिळत नाही. राज्य सरकारने सांगितलं सर्व जागा भरणार, केंद्र सरकारनेही सांगितलं सर्व जागा भरणार पण अजुनही जागा भरलेल्या नाहीत. त्यामुळे आता आपल्याला सर्वांना एकत्र राहावं लागेल, असंही आमदार राजेश टोपे म्हणाले. 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीड