अंबाजोगाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाची दोन मद्यनिर्मिती केंद्रावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 17:30 IST2019-07-12T17:29:56+5:302019-07-12T17:30:46+5:30

पथकाने 1 लाख 32 हजार 900 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला

In Ambejogai, the two production centers of alcohol destroys by State Excise Department | अंबाजोगाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाची दोन मद्यनिर्मिती केंद्रावर धाड

अंबाजोगाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाची दोन मद्यनिर्मिती केंद्रावर धाड

अंबाजोगाई (बीड ) : तालुक्यातील चनईतांडा व दगडुतांडा या दोन ठिकाणी अवैधरित्या मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच शुक्रवारी ( दि.12 ) दुपारी सव्वा बारा ते पावणे दोनच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांच्या पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली. पथकाने 1 लाख 32 हजार 900 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट केल्याची माहिती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागाअंतर्गत वडवणी,केज, माजलगाव,धारूर, परळी,अंबाजोगाई हे सहा तालुके येतात त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अवैध दारू निर्मिती,विक्री,हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे. याच कारवाई अंतर्गत चनईतांडा व दगडुतांडा या दोन ठिकाणी अवैध मद्यनिर्मिती केंद्रांवर धाडी टाकून 2 गुन्हे नोंदवले. सदर ठिकाणी आरोपी मिळून आले नाहीत. महाराष्ट्र दारू बंदी कायदा 1949 अंतर्गत दोन्ही ठिकाणी बेवारस दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड,जवान बि.के.पाटील,जवान आर.ए.जारवाल, वाहनचालक के.एन.डुकरे यांचा सहभाग होता. 

Web Title: In Ambejogai, the two production centers of alcohol destroys by State Excise Department